आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्बन, लावा विंडोज आधारित स्मार्टफोन लाँच करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मोबाइल हँडसेट निर्मितीतील स्वदेशी कंपनी कार्बन आणि लावा येत्या काही महिन्यांत विंडोज आधारित स्मार्टफोन लॉँच करणार आहे. कार्बनच्या हॅँडसेटची किंमत 6000-12000 रुपयांदरम्यान, तर लावाचे हॅँडसेट 6500 रुपयांपासून सुरू होतील.

मेअखेर आणि जूनच्या सुरुवातीस विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम आधारित 4 हॅँडसेट बाजारात आणू. या हॅँडेसटच्या किमती 6000-12,000 रुपयांदरम्यान असतील, असे कार्बनचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप जैन यांनी सांगितले. लावा इंटरनॅशनलचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक ओम राय म्हणाले, लावा ब्रॅँडचे विंडोज आधारित हॅँडसेट जुलैमध्ये येतील. या हॅँडसेटच्या किमती 6500 ते 8500 रुपयांदरम्यान असतील. विंडोज आधारित स्मार्टफोनच्या बाजारपेठेत लावाचा वाटा 8-10 टक्के राहील, असे राय म्हणाले. झोलो ब्रॅँड येत्या काही दिवसांत असे हॅँडसेट आणणे अपेक्षित आहे. या माध्यमातून 2014 च्या अखेरपर्यंत झोलो स्मार्टफोनच्या 15 टक्के बाजारपेठेत सहभाग नोंदवेल, असे झोलोच्या प्रवक्त्याने सांगितले.

अँड्रॉइड बेस्ड हँडसेटचा वाटा 78.1%
गेल्या महिन्यात झालेल्या मोबाइल वर्ल्ड कॉँग्रेसमध्ये मायक्रोसॉफ्टने फॉक्सकॉन, गिओनी, जेएसआर, कार्बन, लावा, झोलो, लेनोवा, एलजी, लॉँगचिर आणि झेडटीई आदी कंपन्यांसोबत काम करत असल्याचे सांगितले. एचटीसी, हुवेई, नोकिया आणि सॅमसंग या कंपन्या विंडोज बेस्ड हॅँडसेटची निर्मिती करत आहेत. 2013 च्या शेवटच्या तिमाहीतील आयडीसीच्या आकडेवारीनुसार, स्मार्टफोनच्या जागतिक बाजारपेठेत अँड्रॉइडचा वाटा 78.1 टक्के आहे, तर विंडोज फोन 3 टक्के आहेत.