आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात घ्या कारची काळजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाचा मान्सून अचानक अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. कारसाठीही मान्सूनचे वेळेआधी दाखल होणे तेवढेच अनपेक्षित आहे. कडक उन्हाळा, धूळ यानंतर बरसणारा पाऊस दाखल झाला आहे. अशा स्थितीत कार व्यवस्थित चालावी यासाठी काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहेत. त्या कोणत्या हे पाहू...


विंडस्क्रीन : कारच्या विंडस्क्रीनवर तेल किंवा ग्रीसचे डाग पडलेले नाहीत याची काळजी घ्या. तसेच काचेवर ओरखडे नसावेत. पावसात गाडी चालवताना दृश्यमानता महत्त्वाची ठरते. विंडस्क्रीनवरील ओरखड्यांमुळे समोरील गाडीचा प्रकाश पसरतो. त्यामुळे समोरचे स्पष्ट दिसत नाही.
ब्रेक : उन्हाळ्याप्रमाणेच पावसाळ्यातही गाडीचे ब्रेक सुस्थितीत असणे गरजेचे असते. ब्रेक फ्ल्यूडमध्ये कोठे गळती आहे का हे तपासून घ्या. हे तेल कमी असेल तर त्याची योग्य पातळी राखा.
लाइट : काळे ढग आल्यास दिवसाही प्रकाश कमी होतो. अशा स्थितीत लाइट लावणे गरजेचे असते. सर्व बल्ब ठीक आहेत का हे तपासून पाहा. लाइटच्या काचांवर धूळ, माती जमलेली आहे का हे तपासा. दिवसा गाडी चालवत असाल तर एलईडी बल्ब बसवणे हिताचे राहील. सर्व इंडिकेटर आणि टेल लॅम्प व्यवस्थित काम करत आहेत का हेही तपासा.
वायपर : विंडस्क्रीनवरील पावसाचे पाणी दूर सारण्यासाठी वायपर अत्यंत उपयुक्त ठरतात. कडक उन्हामुळे वायपरचे रबर ब्लेड अत्यंत कडक होतात. असे रबर ब्लेड चांगल्या रीतीने पाणी साफ करू शकत नाहीत. त्यामुळे काचेवर ओरखडे पडतात. त्यामुळे हे ब्लेड तपासणे आवश्यक ठरते. जर हे ब्लेड थोडे जरी तुटलेले, फुटलेले दिसले तरी ते तत्काळ बदला.
वॉशर : पावसात इतर वाहनांमुळे उडणारे पाणी, पाणीयुक्त चिखल आदी विंडस्क्रीनवर जमा होतात. गाडीतील वॉटर टँकमध्ये पुरेसे पाणी आहे का हे पाहा. गाडी चालवताना अनेकदा या पाण्याने विंडस्क्रीन साफ करण्याची वेळ येऊ शकते. समजा विंडस्क्रीन फ्ल्यूडचा वापर करायचा नसेल तर साधे पाणीही हे काम उत्तमरीत्या करते.
रियर विंड शील्ड : कारच्या मागच्या टायरमुळे उडणारी माती मोठ्या प्रमाणात मागील विंडस्क्रीनवर जमा होते. यामुळे हॅचबॅक कार तसेच एसयूव्ही गाडी चालवताना मागचे दिसण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे मागील टायरसाठी रियर विंड शील्डचा वापर करा.
या बाबींबरोबरच पावसाळ्यात गाडी चालवण्याच्या पद्धतीतही थोडा बदल करावा. महामार्गावर गाडी चालवताना इतर गाड्यांपासून थोडे अंतर ठेवून चालवा. एकदम ब्रेक लावणे टाळा. पादचा-यांच्या अंगावर पाणी उडणार नाही याचीही काळजी घ्या.

लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.
kabeer.mahajan@dainikbhaskargroup.com