आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडिट कार्ड बंद करताना दक्षता हवीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रेडिट कार्डाचा वापर दक्षपणे केला पाहिजे. जर एखाद्या कार्डचा फारसा वापर नसल्यास ते बंद करणे इष्ट. कार्ड रद्द करण्याची प्रक्रिया केली तरी त्याबाबत बँकांकडून स्टेटमेंट येत राहतात त्यात खर्च केलेल्या रकमेचा उल्लेख असतो. कार्ड रद्द करण्याची योग्य पद्धत न अवलंबल्यामुळे असे होते. कार्ड बंद करण्याच्या योग्य पद्धतीविषयी...
पहिली पायरी : बँकेच्या कस्टमर केअर सेवेशी संपर्क साधून खर्च केलेल्या रकमेविषयी माहिती करून घ्या. रक्कम छोटी असेल तर एकरकमी फेडा. रक्कम मोठी असेल तर साप्ताहिक किंवा मासिक हप्त्यावरही फेडता येते. मासिक हप्त्यावर परतफेडीच्या रकमेवर व्याज द्यावे लागेल. अंतिम परतफेडीमध्ये सर्व शुल्क आणि चार्जेसचा समावेश राहील.


पायरी दुसरी : पूर्ण रक्कम फेडल्यानंतर बँकेच्या कस्टमर केअर सेवेला फोन करून कार्ड रद्द करण्याची विनंती करा. फोन केलेली तारीख, वेळ आणि बँकेच्या प्रतिनिधीची नोंद ठेवा. त्याच्याकडून हमी क्रमांक घ्या.
पायरी तिसरी : कंपनीला पत्र पाठवून क्रेडिट कार्ड रद्द केल्याची खात्री करून घ्या. पत्रात विनंती केलेली तारीख आणि प्रतिनिधीचे नाव नमूद करा. पत्र रजिस्टर पोस्टाने पाठवा.


पायरी चौथी : बँकेकडून क्रेडिट कार्ड रद्द झाल्याची हमी मिळाल्यानंतर क्रेडिट कार्डाचे तुकडे करा. तुकडे करताना त्याची मॅग्नेटिक स्ट्रीप नष्ट होईल, याची काळजी घ्या. अशा रीतीने क्रेडिट कार्ड रद्द झाल्याची प्रक्रिया पूर्ण होते.
लक्षात ठेवण्याच्या बाबी : 1. पूर्ण रक्कम फेडल्याशिवाय बँक कार्ड रद्द करणार नाही. 2.परतफेड केलेल्या रकमेत खर्चाशिवाय, व्याज, शुल्क आणि चार्जेसचा समावेश असावा. 3. बिलिंग तारखेनंतर कार्ड रद्द झालेले असेल आणि भरलेली केलेली रक्कम स्टेटमेंटमध्ये आलेली नसेल. 4. केवळ कार्डचे तुकडे करून ते बँकेला पाठवले, तर बँक ते रद्द करणार नाही.5. कार्ड रद्द झाल्याची माहिती बँकेकडून लेखी घ्या.


कार्ड बंद केल्याचा क्रेडिट कार्ड स्कोअरवर परिणाम होतो? : कार्ड बंद केल्यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. असे केल्याने एकूण क्रेडिट मर्यादा घटते व त्याचा वापर वाढतो. जर एखाद्याकडे तीन कार्ड आहेत आणि त्याची एकूण लिमिट 1.5 लाख रुपये आहे आणि महिन्याकाठी खर्च 75 हजार रुपये आहे. अशा स्थितीत क्रेडिट लिमिटचा 50 टक्के वापर करतो. मात्र, 50 हजार रुपये लिमिटचे कार्ड बंद केल्यास एकूण वापर 75 टक्के होतो. त्यातून कर्ज प्रवृत्ती असल्याचे भासते.


क्रेडिट कार्ड बंद करू नये का ? : असे कदापि नाही. फसवणुकीपासून वाचण्यासाठी वापरात नसलेले कार्ड बंद करणे केव्हाही चांगले. जर एकापेक्षा जास्त के्रडिट कार्ड बंद करायचे असतील तर ते एकदम बंद न करता टप्प्याटप्याने बंद करावेत, कारण क्रेडिट हिस्ट्री जेवढी जुनी, तेवढा क्रेडिट स्कोअर चांगला राहील. यामुळे बँका कर्ज फेडण्याच्या पद्धतीबाबत हमी देऊ शकतात. आगामी काळात कर्ज लागल्यास यामुळे मदत होते. त्यामुळे जुन्या कार्डापेक्षा जे कार्ड नवे आहे ते बंद करावे.


योग्य पद्धतीने कार्ड बंद न झाल्यास परिणाम काय ?: अशा स्थितीत कार्डावर रक्कम राहू शकते. जर बँकेकडून कार्ड रद्द झाल्याचे पत्र न आल्यास बँक त्या कार्डवर नूतनीकरण शुल्क आकारू शकते. ते आपल्या खात्यावर खर्चाच्या रूपात दिसते. यावर महिन्याला व्याज लागेल व आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल. त्यामुले आगामी काळात कर्ज मिळण्यात अडथळा येऊ शकतो. क्रेडिट कार्ड रद्द करण्याच्या काळात सतत बँकेशी संपर्कात राहा. त्यानुसार प्रक्रिया पूर्ण करा.


लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.