आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Case Ripe For RBI To Cut Rates In Monetary Policy Review?

रिझर्व्ह बँकेचा धोरण आढावा आज; व्याजदर पुन्हा जैसे थे ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अपुर्‍या पावसामुळे नजीकच्या काळात अन्नधान्याची महागाई वाढण्याची शक्यता आहे. नेमक्या याच चिंतेमुळे मंगळवारी जाहीर होणार्‍या नाणेनिधी धोरण आढाव्यामध्ये रिझर्व्ह बॅँक व्याजदर पुन्हा एकदा जैसे थे ठेवेल, असाच सूर व्यक्त केला जात आहे.

सध्या अन्नधान्याची महागाई आठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. महागाई नियंत्रणात आणण्यास प्रथम प्राधान्य असल्याने रिझर्व्ह बॅँक व्याजदराबाबत तटस्थ राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कांदा, टोमॅटो, बटाटा या सार्‍याच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भडकल्या असून त्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मान्सूनही सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे नजीकच्या काळात अन्नधान्याची महागाई अधिक भडकण्याची शक्यता आहे.