आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cci Seminar Golf Country Invest In Infrastructure

सीसीआयच्या परिसंवाद : अरब अमिरातीने पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक करावी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नवीन राष्ट्रीय धोरणाचा एक भाग म्हणून भारताला जागतिक दर्जाचे उत्पादन केंद्र बनवण्यासाठी जास्तीत जास्त सहभाग अपेक्षित असून संयुक्त अरब अमिरातीने देशातील पायाभूत आणि अन्य क्षेत्रांत गुंतवणूक करावी, असे आवाहन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी एस. महालिंगम यांनी केले. कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते.
भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील आर्थिक भागीदारी झपाट्याने वाढत असून 2010 - 11 या वर्षात 70 अब्ज डॉलरचा व्यापार उभय देशांमध्ये झाला.
पेट्रोलियम उत्पादनांच्या पलीकडे जाऊन दोन्ही देशांनी लाइफ सायन्स, जैवतंत्रज्ञान, हेल्थकेअर, वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय शिक्षण आणि औषध या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच महालिंगम यांनी देशातील पायाभूत आणि अन्य क्षेत्रांचाही गुंतवणुकीसाठी विचार करण्यात यावा, याकडे लक्ष वेधले.
अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक माजेद सालेम रोमायथी यांनी, भारतातील गुंतवणुकीबाबत आपण आशावादी असून खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांत गुंतवणूक करण्याचा विचार करू, असे स्पष्ट केले.
भारतीय भांडवल बाजारात दोलायमान वातावरण असले तरी आम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असल्यामुळे त्याचा आम्ही विचार करीत नाही. उलट दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून बाजारातील चढ- उतार ही आमच्यासाठी एकप्रकारे संधीच आहे. अन्य उगवत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन्ही देशांमधील सांस्कृतिक सामंजस्याची नाळ चांगली जोडली गेली असून ती निरंतर अशीच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.