SMARTBAND दूर करणार / SMARTBAND दूर करणार डोकेदूखी, मिनटात होणार मायग्रेनचा उपचार

Mar 14,2014 06:04:00 PM IST
मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी एक गॅजेट डिझाइन करण्यात आले आहे. हे एक खास पद्धतीचे हेडबँड आहे जे तुम्हाला
पट्टीसारखे डोक्यावर लावावे लागते. मंगळवारी या बँडला फुड अ‍ॅण्ड ड्रग अडमिनिस्ट्रेशनेही मंजूरी दिली आहे.
या बँडला सेफैली (cefaly) हे नाव देण्यात आले असून हे बँड बॅटरीवर चालते आणि प्लास्टिकचे बनलेले आहे.
कसे काम करते
हे हेडबँड यूजर्सने घातल्यावर त्याच्या डोक्यात इलेक्ट्रिक करंट पास होते. हा हालका इलेक्ट्रिक शॉक मायग्रेनसाठी फायदेशीर ठरू शकतो. हा हेडबँड लावल्यावर यूजर्सना थोड्या गुदगल्याही होऊ शकतात.
कसे वापरावे
हे डिव्हाइस 18 वर्षापुढील यूजर्ससाठी तयार करण्यात आले आहे. डोकेदूखी असेल तेव्हा केवळ 20 मिनिटे हा हेडबँड डोक्यावर लावावा लागेल.
कसा तयार करण्यात आला हा बँड किती लोकांवर केली टेस्ट जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.
किती लोकांवर टेस्ट करण्यात आले हे हेडबँड हे हेडबँड FDA कडून 2,313 लोकांवर टेस्ट करण्यात आले आहे. 53 टक्के लोक या डिव्हाइसपासून संतूष्ट आहेत. हे डिव्हाइस मायग्रेनला पूर्णपणे संपवू शकत नसले तरी यामुळे माइग्रेनचा त्रास मात्र नक्कीच कमी होतो. FDA द्वारा 67 लोकांवर केलेल्या अभ्यासात हे लक्षात आले आहे, की या बँडचा ज्या लोकांनी वापर केला त्यांना प्रत्येक महिन्यात होणा-या माइग्रेन अॅटॅकची संख्या कमी झाली आहे.विचित्र होते रिझल्ट या बँडचा वापर करणा-या यूजर्सच्या मते या बँडचे कोणतेही साइड इफेक्टस नाहीत. तरीही लोक या बँडचा वापर करू इच्छीत नाहीत कारण त्यामुळे त्यांना झोप येते. हा बँड वापरल्याने त्यांना विचित्र वाटत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. कोणी तयार केला सेफैली हेडबँड बेल्जियममधील सेफैली टेक्नॉलॉजीने तयार केले आहे. FDAकडून माइग्रेनचा उपचार तयार करणा-या बँडचे अप्रूवल मिळवणारी सेफैली पहिलीच कंपनी ठरली आहे. किंमत- हे बँड अमेरिका आणि कॅनडामध्ये $249.99 म्हणजेच 15303.14 रूपयांत मिळत आहे.
X