आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉर्स रायडिंग बनली विजय माल्यांची पॅशन; छंद जोपासण्यासाठी करतात कोट्यवधींचा खर्च!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार आणि बाईक रायडिंगचा(घोडेस्वारी) छंद तर अनेक सेलिब्रिटीज् जोपासतात, परंतु हॉर्स रायडिंग ही काही निवडक सेलिब्रिटीजची आता पॅशन बनली आहे. हॉर्स रायडिंगमध्ये आनंद तर मिळतोच सोबतच चांगले आरोग्यही लाभत असल्याचे काही सेलिब्रिटीज् आवर्जुन सांगतात.

मद्यसम्राट विजय माल्या यांना वयाच्या 21व्या वर्षी पहिल्यादा घोडेस्वारी केली होती. विशेष म्हणजे स्वत: घोड़ा खरेदी करून त्यावर रायडिंग केली होती. आज विजय माल्या यांचे नाव देशातील आघाडीच्या तीन घोडेस्वारांमध्ये केली जाते. (अन्य दोन पूनावाला आणि एमएएम रामास्वामी)
गेल्या काही महिन्यांपूर्वी माल्या यांनी सुमारे चार कोटी रुपयांचा घोडा खरेदी केला होता. विजय माल्यांचे नाव जगातील अब्जाधिशांच्या यादीतून आऊट झाले असले तरी आजही ते आपल्या घोडेस्वारीचा छंद जोपासण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात.

विजय माल्या हे मुंबई, बंगळुरु आणि पुण्यात हॉर्स रेस आयोजित केले होते. खास घोडेस्वारीसाठी विजय माल्या यांनी कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यात 1992मध्ये 450 एकर जागेवरील कुनीगल स्टड फार्म खरेदी केले होते. हे फार्म जवळपास 200 वर्षे पुरातन आहे. सध्या कुनीगल स्टड फार्ममध्ये हॉर्स रायडिंगचे ट्रेनिंग दिले जाते. माल्या यांचा घोड्यांच्या चमूमध्ये अनेक विदेशी घोड्यांचा समावेश आहे.

आपल्या कामातील काही फुरसतीचे क्षण वेचून माल्या स्वत: घोड्यांची काळजी घेण्यासाठी येथे पोहोचतात. घोडेस्वारी केल्यानंतर शरीरात एक वेगळीच स्फूर्ती येत असल्याचे विजय माल्या यांनी सांगितले आहे.

पुढ़े वाचा, या स्टार्सलाही आहे हॉर्स रायडिंगचा छंद...
(फाइल फोटो- विजय माल्या)