आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलकॉनने लॉन्च केला सर्वात स्वस्त अँड्रॉईड किटकॅट स्मार्टफोन; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Campus A15K)
गॅजेट डेस्क - भारतीय स्मार्टफोन मेकर सेलकॉन इंडियाने आज त्यांचा अँड्राइड किटकॅटवर चालणारा स्मार्ट फोन लॉन्च केला आहे. Campus A15K नावाने लॉन्च झालेल्या या फोनची किंमत कंपनीने केवळ 3449 एवढी ठेवली आहे. मागील काही महिन्यांपासून कंपनी लो बजेट फोन्सची रेंज वाढवत आहे. यापूर्वी कंपनीने Celkon Campus A35k (भारतातील सर्वात स्वस्त अँड्रॉईड किटकॅट स्मार्टफोन) लॉन्च केला आहे.

Campus A15K कंपनीच्या अँड्रॉईड किटकॅट स्मार्टफोनच्या श्रेणीला पुढे नेण्यास मदत करेल. मागील काही महिन्यांमध्ये भारतात लो बजेट स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात आयात झाली आहे. जवळपास सर्वच स्मार्टफोन्स कंपन्यांनी भारतात लो बजेट स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. यामध्ये मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन, सेलकॉन यांनी अँड्रॉईड किटकॅट 4.4.2 ऑपरेटिंग सिस्टम असलेले अनेक स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. यामुळे ग्राहकांना बाजारात अनेक ऑप्शन तयार झाले आहेत.

सेलकॉनच्या कॅम्पस A15K ची विक्री केव्हापासून सुरू होईल या बद्दल कंपनीने अजून कोणतीच माहिती दिलेली नाही. मात्र हा फोन लवकरच रिटेल स्टोअरवर मिळेल अशी शक्यता आहे. या फोनसोबत कंपनी मोफत फ्लीप कव्हर देणार आहे.
पुढील स्लाई़डवर वाचा, या फोनच्या फीचर्सबद्दल -