आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7999 रु. चा Celkon Q455 लॉन्च; 8MP कॅमेर्‍यासोबत अँड्राईड 'किटकॅट' सुध्दा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Celkon Millennium Vogue Q455 लॉन्च इवेंटमध्ये सानिया मिर्जा )
गॅजेट डेस्क - सेलकॉनने आपला नवीन स्मार्टफोन मिलेनियम वोग Q455 लॉन्च केला आहे. 7999 रुपयांची किंमत असलेला हा स्मार्टफोन भारतील मोबाईल बाजारातील लोबजेट स्मार्टफोनमध्ये चांगला पर्याय आहे. 7.9 mm एवढा स्लीम असलेला मिलेनियम वोग अँड्राईड किटकॅट ऑपरेटींग सिस्टीमवर चालतो. या मोबाईलच्या किंमत आणि स्पेसिफिकेशनचा जर विचार केला तर हा फोन मोटो E आणि लावा आइरिस X1 सारखाच आहे. मोटो E च्या किंमतीएवढीच किंमत असल्याने हा फोन लोकप्रिय होऊ शकतो.
स्लीम आणि स्टायलिश असलेला हा हॅन्डसेट कंपनीकडून कमी किंमतीत मिळतो. भारतीय मोबाईल बाजारात स्मार्टफोन कंपन्या एका मागोमाग एक अत्याधुनिक फीचर्सवाले स्मार्टफोन बाजारात उतरवत आहेत. यामुळे ग्राहकांनाही अनेक पर्याय मिळत आहेत. सेलकॉनबद्दल बोलायचे झाल्यास या कंपनीने अँड्राईड़ किटकॅटवर चालणारा भारतातील सर्वात स्वस्त Celkon A35k (किंमत 2999 रुपये) हा स्मार्टफोन यापूर्वीच लॉन्च केला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा सेलकॉन Millennium Vogue Q455 च्या फीचर्सबद्दल, सोबतच पाहा लॉन्च इव्हेंटचे काही फोटो