आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Centre Government Discusses On Inflation With State Food Ministers

साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्राला हवी राज्य शासनाची मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः महागाईला लगाम लावण्यासाठी आज केंद्र सरकारने राज्य सरकारकडे मदत मागितली आहे. आज झालेल्या बैठकीत केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी सर्व आज राज्यांच्या अन्न पुरवठा मंत्र्यांना महागाई कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच या बैठकीत साठेबाजीला अजामीनपात्र गुन्हा बनवण्यात यावा असेही मत मांडण्यात आले आहे.
महागाई कमी करण्यासाठी बनवण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीने या बैठकीत साठेबाजीला अजामीनपात्र गुन्हा ठरवावा तसेच या संदर्भातील सर्व खटले विशेष कोर्टात चालवले जावे असे मत व्यक्त केले. मात्र साठेबाजांना पकडणे राज्य सरकारसाठी एवढे सोपे नाही. साठेबाज हे छोटे व्यापारी नसतील, तरी त्यांनी जमा केलेला साठा हा एका ठिकाणी नसतो. त्यामुळे या कायद्यांतर्गत एखाद्या साठेबाजाचा गुन्हा सिध्द करणे हे केवळ अशक्यच आहे.
एपीएमसी कायद्यांतर्गत फळ आणि भाज्यांना डी-लिस्ट करण्याचा उपाय
बटाटा, कांदा, दाळ आणि तांदूळ यांच्या किंमती आवाक्यात ठेवण्यासाठी साठ्याची मर्यादा ठरवणे याचे संपूर्ण काम राज्य सरकारच्या खांद्यावर आहे. तसेच शेतकर्‍यांसाठी एपीएमसीऐवजी शेती बाजार बनवण्यात यावा असे केंद्र सरकारने सुचवले आहे.
राज्य सरकारकडून अपेक्षापुर्ती होईल का?
राज्यातील अंतर्गत व्यापाराशी संबंधीत अडचणींना दूर करण्यासाठी तसेच सार्वजनिक शेती बाजार बनवण्यासाठी कृषी उत्त्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कायद्यावर चर्चा होणे बाकी आहे. 2012 मध्ये तत्कालिन कृषी मंत्री शरद पवार यांनीही या कायद्यात संशोधन केले होते. मात्र काही राज्यांनीच या बदलांचे अनुसरण केले. साठेबाजीला अजामीनपात्र गुन्हा म्हणून जाहिर करण्यासाठी राज्य सरकारलाही राजकीय पध्दतीने अडचणी येणार आहेत.
मात्र आज झालेल्या या बैठकीतून एक गोष्ट तर सिध्द झाली की, केंद्र सरकारला महागाई आणि साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्याचे आपले आश्वासन पुर्ण करण्यासाठी राज्य सरकारची मदत घ्यावीच लागणार आहे. राज्याच्या मदतीशिवाय हे काम करणे अवघडच नाही तर अशक्यच आहे, हे आज झालेल्या बैठकीतून दिसून आले.