आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Kodak ने लॉन्च केला पहिला स्मार्टफोन; 13 मेगापिक्सल कॅमेर्‍यासह लेटेस्ट फीचर्स!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Kodak कंपनीने CES 2015 मध्ये आपला पहिला कॅमेरा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. दिर्घकाळ विश्रांतीनंतर Kodak ने नवा डिव्हाइस बाजारात सादर केले आहे. लॉस वेगासमधील आयोजित टेक शो CES 2015 मध्ये Kodak ने Kodak IM5 हा 13 मेगापिक्सल कॅमेर्‍याने अद्ययावत असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. CES-2015 मध्ये आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याचे कंपनीने मागील महिन्यातच जाहीर केले होते.

काय आहे वैशिष्ट्ये....
Kodak च्या अफोर्डेबल फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेर्‍यासह लेटेस्ट फीचर्स आहेत. Kodak IM5 या फोनसाठी Kodak कंपनीने ब्रिटिश कंपनी Bilt शी करार केला आहे.

Kodak चा हा स्मार्टफोन कॅमेरा सेंटर असून याची किंमत 15,800 रुपये आहे. Kodak चा नवा फोन 2015 च्या तिमाहीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, Kodak IM5 मधील स्मार्ट फीचर्स...