आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्जा स्रोतांचा कार्यक्षम वापर हे देशापुढील आव्हान: फिकी-पीडब्लूसीचा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भारताला परवडणारा, पुरेसा आणि सातत्याने उर्जा पुरवठा होणे हे आगामी काळातील सर्वात मोठे आव्हान असून देशाचा विकास त्यावर अवलंबून राहील असा अंदाज प्राईस वॉटरहाउस कुपर (पीडब्लूसी) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांनी केलेल्या उर्जा सुरक्षितता विषयक पाहणीत व्यक्त केला आहे. फोर्जिंग टाइज: सिक्युअरिंग एनर्जी सप्लाय फॉर स्ट्रोन्गर इकोनॉमी हा अभ्यास अहवाल दोन्ही संस्थांनी संयुक्तरीत्या तयार केला आहे. उपलब्ध स्रोतांचा कार्यक्षम वापर, इतर देशांचे सहकार्य आणि त्यात अडथळे याअंगाने हा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यास पाहणीतील काही निरीक्षणे अशी आहेत.


1) जगात उर्जेचा वापर 2011च्या (2.4) तुलनेत 2012मध्ये केवळ 2.1 टक्के वाढला.
2) युरोपीय समुदायाचा वापर 0.8 टक्के कमी झाला
3) उत्तर अमेरिकेचा वापर 1.8 टक्के घटला
4) भारताचा 5.4 तर चीनचा 7.7 टक्के वाढला.
5) भारत जगातील चवथ्या क्रमांकाचा उर्जा वापर करणारा देश असून इंधनाचा दरडोई वापर 456 किलो आहे. भारताची मागणी 2035 मध्ये तिप्पट होणार आहे.

तेल, वायू आणि कोळसा याचा सर्वाधिक वापर भारत करत असल्याने त्यावर असलेले अवलंबित्व कमी करणे हे मोठे आव्हान आहे असल्‍याचे अहवालात म्हटले आहे. 2031-32 मध्ये देशाची इंधन आयात 90 टक्के होईल असा अंदाज आहे.

निर्यात प्रमाण चांगले असले तरी त्यातील 56 टक्के उत्पन्न आयातीवर खर्च होते ही बाब अधिक गंभीर आहे असल्‍याचे त्यात म्हटले आहे. तेल निर्यातदार देशांशी असलेले राजकीय संबंध दृढ करणे हाही एक चांगला पर्याय असून त्याकडे धोरण कर्त्यांनी लक्ष द्यायला हवे असे त्यात म्हटले आहे.