Home | Business | Gadget | charge phone once and use 40 days

मोबाईल चार्ज करा एकदा आणि वापरा ४० दिवस

बिजनेस ब्यूरो | Update - Jun 13, 2011, 12:29 PM IST

फोनचे वैशिष्ट म्हणजे हा मोबाईल खूप स्वस्त आणि ड्युएल सीम कार्डची सुविधा यात आहे

  • charge phone once and use 40 days

    सतत मोबाईल चार्ज करून वैतागणा-या मोबाईल धारकांसाठी आता खुशखबर आहे. आता एकदा मोबाईल चार्ज केला की पुन्हा ४० दिवस त्याची बॅटरी चालणारा मोबाईल फोन बाजारात उपलब्ध झाला आहे. या फोनचे वैशिष्ट म्हणजे हा मोबाईल खूप स्वस्त आणि ड्युएल सीम कार्डची सुविधा यात आहे. भारतातील ‘झेन’ या मोबाईल निर्मिती करणा-या कंपनीने ‘एम-७२’ नावाचे नवीन मॉडे ल बाजारात उपलब्ध करून दिले आहे. या फोनचे वैशिष्ट म्हणजे याची बॅटरी ४० दिवस चालते आणि ६ सेंटिमीटर लांब एवढी त्याची स्क्रीन आहे. १.३ मेगापिक्सलचा कॅमेरा या मोबाईल मध्ये आहे.

    यामध्ये ब्लू टूथ, ड्युएल टॉर्च, एमपी ३, एमपी ४, आणि एफएम रेडिओही आहे. १६ जीबी पर्यंत फोनची मेमरी वाढवता येऊ शकते.

    या मोबाईल ची किंमत देखील १७४९/- इतकी कमी आहे आणि कंपनीच्या दाव्यानुसार इतक्या सुविधा असलेला आणि किंमतीने स्वस्त असलेला हा भारतातील पहिला मोबाईल आहे.Trending