आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cheap Home News In Marathi, Divya Marathi, RBI Deputy Governor

घरे स्वस्त होणार, रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात सध्या तयार घरे एवढी आहेत की आगामी काळात घरांच्या किमती कमी होण्याची दाट शक्यता असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त डेप्युटी गर्व्हनर एस. एस. मुंद्रा यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषदेच्या एका कार्यक्रमात मुंद्रा यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, देशात सध्या घरांची खरेदी करणे हा अनेकांसाठी महागडा व्यवहार आहे. देशातील ६० टक्क्यांहून जास्त लोकसंख्या दोन डाॅलरपेक्षा (सुमारे १२० रुपये) कमी रकमेत कशीबशी गुजराण करत असताना स्वस्तात घरे उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यांच्याकडे एक घर आहे आणि दुस-या घरासाठी ते बँकांकडून कर्ज घेताहेत अशी िस्थती फार दिवस चालणार नाही. कृत्रिम मागणी फुगवट्याची िस्थती निमार्ण होऊ देणार नसल्याचे सांगून मुंद्रा म्हणाले, अशा तर्कांचा घराच्या िकमतीत २२ टक्के वाटा असतो. उत्तम तंत्राचा वापर करून घरांचा खर्च कमी करता येतो.

देशातील िचत्र
१.८८ कोटी घरांची गरज आहे देशभरात.
०७४ लाख मध्यमवर्गीय कुटूंबे घराविना.
६० टक्के लोकसंख्या दररोज दोन डाॅलरपेक्षा कमी रकमेत उदरनिर्वाह करते.

कर्जाची कमतरता नाही
बँकांकडून कर्ज मिळत नाही, अशी ओरड रिअल इस्टेट क्षेत्राकडून नेहमीच होते. मात्र, रिझर्व्ह बँकेने हे आरोप फेटाळून लावले आहेत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर मुंद्रा यांनी सांगितले, २००९ च्या तुलनेत सध्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या कर्जात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार घरे आणि रिअल इस्टेटसाठी बँका आता सहजतेने कर्जपुरवठा करत आहेत.

स्वस्त घरांसाठी नियम बदलणार
मुंबई - वाजवी दरातील घरांसाठी (अफोर्डेबल) िरझर्व्ह बँक नियमात बदल करणार आहे. तळागाळातील लोकांना घरे िमळण्यासाठी व्याजदरात पाच टक्के अनुदानाचे निकष शिथिल करण्याची तयारी सुरू आहे. सध्या हे अनुदान एक लाखापर्यंतच्या कर्जासाठी असून आता ते वाढवून पाच लाखांपर्यंत करण्यात येणार आहे.