कमी किमतीतील स्मार्टफोन तयार करण्यासाठी स्वस्त पार्ट गरजेचे असतात. ARM आणि MediaTek या दोन्ही कंपन्यानी लो बजेट प्रोसेसर तयार करण्याची स्पर्धा सुरू केली आहे. या दोन्ही कंपन्यानी Cortex A17 आणि MT6595 हे प्रोसेसर लॉन्च केले आहेत.
ARM कॉर्टेक्स प्रसोसर मिडीयम रेंज मार्केटसाठी तयार करण्यात आले आहे. लेटेस्ट फिचर सोबतच हे कोर्टेक्स प्रोसेसर जबरदस्त स्पिड आणि चांगला परफॉर्मेंस देतो. ARMचे प्रोसेसर स्मार्टफोन, टॅबलेट, स्मार्ट टिव्ही अशा सर्वच गॅजेटसाठी चांगले आहेत.
ARMने कोर्टेक्स A17 प्रोसेसर लॉन्च केल्यावर लगेचच MediaTekने 4G LTE फिचर असणारा ऑक्टा-कोर प्रोसेसेर लॉन्च केले. स्मार्ट डिव्हाइससाठी हे एक प्रमियम मॉडेल ठरू शकते. 4G LTE फिचर असणारे हे भारतातील पहिलेच प्रोसेसर आहे. या दोन्ही प्रोसेसरची किंमतही जवळजवळ सारखीच आहे.