आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जर तुम्ही चेकबुकचा वापर करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. रिझर्व्ह बँकेने आता काही नियमांत बदल केले आहेत. या बदलाकडे कानाडोळा करणा-यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. प्रत्यक्षात आरबीआयने चेक वटवताना होणा-या धोकेबाजीला आळा घालण्याच्या दृष्टीने काही स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
आरबीआयच्या मते, 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे चेक क्लिअरिंगसाठी आल्यास बँकांना खास करून बजावण्यात आले आहे. त्यांना असे सांगण्यात आले आहे, पाच लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे चेक क्लिअरिंगसाठी आल्यास चेक देणा-याची योग्य खातरजमा करून घ्या. पूर्ण समाधान किंवा खात्री पटल्यानंतरच चेक वटण्यास मंजुरी द्या, अशी सावधगिरी बाळगली तरच कोणत्याही प्रकारच्या बनवेगिरीला आळा घालता येईल.
आरबीआयच्या अधिका-यांचे म्हणणे आहे की, चेक क्लिअरिंग देताना देणा-या पार्टी, कंपनी अथवा व्यक्तीशी फोनवर संपर्क साधा. चेकसंदर्भात पूर्ण माहिती घ्या. बँकेत यासाठी वेळ लागत असेल तर एसएमएस अॅलर्ट योजना सुरू करा. पंधरा मिनिटांत उत्तर न आल्यास चेक वटवू नका.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.