आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयकर वाचवण्यासाठी साध्या उपाययोजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रहो आता 31 मार्च जवळ येत आहे. आर्थिक वर्ष 2013-14 संपण्यातच आहे. त्याआधी आपण सर्वांनी एकदा आपल्या आर्थिक हिशेबाचा आढावा घ्यावा आणि आपली करदेयता करनियोजन करून किमान कशी राहील याचा विचार करणे आवश्यक आहे.

आर्थिक वर्ष 2013-14 म्हणजेच कर निर्धारण वर्ष 2014-15 साठी ज्येष्ठ नागरिकांसाठी रुपये 2,50,000 (अडिच लाख) पर्यंत उत्पन्न करमुक्त आहे. अति ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा रुपये 5,00,000 असून इतर व्यक्तींसाठी रुपये 2,00,000 आहे. त्यापुढील उत्पन्नावर आयकर कायदा 1961 प्रमाणे विविध दराने कर लागतो.

आयकर कायद्यात विविध कलमांमध्ये सूट दिलेल्या आहेत. त्यापैकी ज्या सर्वाधिक सोयीच्या आहेत त्या पुढीलप्रमाणे
1) कलम 80 सी खाली विविध गुंतवणूक केल्यास उत्पन्नातून त्याची वजावट मिळते. सदर सूट ही रु. 1,00.000 पर्यंतच मर्यादित आहे. ही बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे. याअंतर्गत भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत पत्र, विमा, म्युच्युअल फंड, 5 वर्षे किंवा अधिक कालावधीसाठी बॅँकेत मुदत ठेव, पेन्शन फंड, मुलांची ट्युशन फी, गृहकर्जावरील परतफेड केलेली मुद्दल, नाबार्डचे रोखे, पाच वर्षांची पोस्टात मुदत ठेव इत्यादींचा समावेश होतो.

2) कलम 80 डी खाली मेडिक्लेम पॉलिसी घेतल्यास त्यामध्ये रु. 15,000 पर्यंत सूट मिळू शकते. जर पालकांसाठी वेगळी पॉलिसी घेतली तर आणखी रु. 15,000 सूट मिळू शकते.आणि जर स्वत: किंवा पालक हे ज्येष्ठ नागरिक असतील तर ही सूट रु. 15,000 ऐवजी रु. 20,000 पर्यंत एवढी मिळते. यात पॉलिसीचे रुपये हे रोख न देता इतर कोणत्याही प्रकारे दिलेले चालतात.

3) कलम 80 ई खाली जर शिक्षण कर्ज घेतले असेल तर, ज्या वर्षापासून व्याज देण्यास सुरुवात केली. त्या वर्षापासून आठ वर्षापर्यंत सूट मिळते. या कलमाखाली स्वत:साठी किंवा पत्नी आणि मुलांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजात सूट मिळते.

4) कलम 80 जी या कलम खाली विविध फंड किंवा सेवाभावी संस्थांना दिलेल्या देणगीवर सूट मिळते. काही संस्थांना दिलेल्या रकमेच्या 100 टक्के काहींना 50 टक्के आणि काहींना कलममध्ये दिलेल्या सूत्रानुसार काढलेल्या रकमेची सूट मिळते.