आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांच्या मनमानीस लगाम; बचत ठेवींवर देणार अधिक व्याज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 15 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या मुदत ठेवीवर जितके व्याज मिळते तितकेच त्यापेक्षा कमी रकमेवरही लवकरच मिळू शकेल. भारतीय रिझर्व्ह बँक याबाबत लवकरच दिशानिर्देश जारी करणार आहे.
मुदत ठेवीत तगडी गुंतवणूक करणार्‍यांना आकर्षित करताना बँकांनी भेदभावाचे धोरण अवलंबवू नये, असे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. सध्या बँका लघु मुदतीच्या ठेवींसाठी 15 लाख वा त्यापेक्षा अधिक रकमेवर अधिक व्याज देतात. दुसरीकडे, 15 लाखांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवर मात्र तुलनेने कमी व्याज मिळते.
बँकांची ही पद्धत बाजारात असमान तरलता वाढवत असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. याशिवाय जमा दरांच्या निश्चितीसाठी चुकीच्या पद्धतींना यामुळे प्रोत्साहन मिळत आहे. रिझर्व्ह बँकेने सर्व नोंदणीकृत बँकांना सांगितले की, त्यांनी बचतींवरील व्याजदरांच्या निर्धारणसाठी संतुलित पद्धत तयार करावी, जेणेकरून हा असमतोल संपू शकेल.
देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 7 ते 90 दिवसांच्या ठेवींवर 15 लाख वा त्यापेक्षा कमी रकमेवर 7.0 टक्के व्याज देण्यात येते. याउलट 15 लाख ते 1 कोटी रुपयांच्या ठेवींवर मात्र बँक 8 टक्के दराने व्याज अदा करते. याचप्रमाणे एका वर्षापेक्षा कमी अवधीसाठी व्याजदरांत बँका अर्धा ते एका टक्क्याचा भेदभाव करत आहेत.
ओरिएंटल बँक ऑफ कॉर्मस 31 ते 45 दिवसांसाठी 15 लाखांपेक्षा कमी रकमेवर 5.0 टक्के व्याज देत आहे. 15 लाखांपेक्षा अधिक व एका कोटीपेक्षा कमी रकमेवर ही बँक मात्र 7.25 टक्के व्याज देते. याप्रमाणे 179 दिवसांपर्यंतच्या इतर ठेवींवरील व्याजात बँकेने 0.25 ते 2.25 टक्के दरांचे अंतर ठेवले आहे
बँक ऑफ बडोदा 91 ते 180 दिवसांसाठी 15 लाखांपेक्षा कमी ठेवींवर 7.0 टक्के व्याज देते. यापेक्षा अधिक रकमेवर बँकेकडून 7.25 टक्के व्याज मिळते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांनी व्याजदर निश्चिती करण्यासाठी पारदर्शक धोरण आखावे, ते संचालक मंडळाकडून मंजूर घ्यावे, अशा सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्या आहेत.