आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chidambaram Assures To Complete Various Projects

रखडलेले प्रकल्प मार्गी लावणारः चिदंबरम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विविध प्रकारच्या मंजुर्‍या तसेच अन्य काही कारणांमुळे देशभरातील 340 प्रकल्प रखडले असले तरी या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यासाठी बॅँक अधिकारी आणि उद्योगांबरोबर बैठक घेऊन एखादा विशिष्ट प्रकल्प कोणत्या कारणामुळे रखडला आहे याचा शोध घेतला जाईल आणि तो अडथळा दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे वचन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिले.

भूसंपादन, वने, पर्यावरण मंजुर्‍या तर काही प्रकरणांत बँकांकडून कर्जाची फेररचना करण्याची अक्षमता आदी विविध कारणांमुळे 125 नवीन प्रकल्पांसह जवळपास 341 प्रकल्प रखडले असल्याचे स्पष्ट करून चिदंबरम म्हणाले की, बॅँक अधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीत थंड पडलेले प्रकल्पांचा शोध घेणे हा मुख्य विषय होता.

प्रकल्पांची कामे थंडावण्यासाठी चार किंवा पाच कारणे असून ती सर्व प्रकल्पांसाठी लागू आहेत. त्यासाठी प्रकल्पामागून प्रकल्पांबरोबर या कारणांची सोडवणूक करावी लागेल, असे स्पष्ट करून याच स्वरूपाचा सराव लवकरच चेन्नईतील प्रकल्पांसाठी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रखडलेल्या प्रकल्पांच्या वाढत्या संख्येमुळे चिंताग्रस्त झालेल्या केंद्र सरकारने अतिभव्य प्रकल्पांच्या आड येणारे अडथळे दूर करण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय मंत्रिमंडळ समितीची स्थापना केली आहे. ही समिती संरक्षण मंत्रालयाने 31 अन्य तेल आणि वायू क्षेत्रांवर लादलेले कडक निर्बंध शिथिल करण्याची शक्यता चिदंबरम यांनी व्यक्त केली. बॅँक अधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीत थंड पडलेले प्रकल्पांचा शोध घेणे हा मुख्य विषय होता.