आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या भविष्यासाठी तीन गुंतवणूक पद्धती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहनचा मुलगा एक वर्षाचा झाला आहे. त्याने एकुलत्या एक मुलाचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्लॅन करावा लागेल, हे मोहनला माहीत आहे. मुलासाठी तीच योग्य भेटवस्तू असेल. आई-वडिलांनी मुलांना दिलेल्या पैशांपासून गुंतवणुकीला सुरुवात करण्याची त्याची इच्छा आहे. आता त्याने काय करायला हवे?

पहिले- मुलाच्या नावे एक मायनर बँक खाते उघडले पाहिजे. मोहन किंवा त्याची पत्नी खात्यावर व्यवहार करू शकतात. सण-उत्सव किंवा वाढदिवसाला मिळणारे पैसे त्या खात्यात जमा करा. जमा झालेली रक्कम जास्त झाल्यास फिक्ससाठी टाका. ती मॅच्युअर झाल्यावर पुन्हा रिन्यू करा. जेणेकरून चालू दराने व्याज मिळेल.

दुसरे- बचत करता आली तेव्हा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ)मध्ये जमा करा. ही बचत दर महिन्याला करणे आवश्यक नाही. पीपीएफ अकाउंट मायनरच्या नावे उघडले जाऊ शकते. त्यात दर महिन्याला पैसे भरणे बंधनकारक नसते. मोहनला टॅक्स वाचवण्यासाठीही हे खाते उपयोगात येऊ शकते. दरवर्षी मिळणारे व्याज वाढत राहते. हे खाते 15 वर्षांसाठी उघडले जाऊ शकते. त्यात बचतीपैकी 20 टक्के रक्कम ठेवायला पाहिजे.

तिसरे- या दोन पर्यायानंतर मोहनची दर महिन्याला काही बचत होऊ लागली तर त्याने मुलाच्या नावावर म्युच्युअल फंड्सही घ्यायला पाहिजेत. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे इंडेक्स इक्विटी फंड किंवा डायव्हर्सिफाइड लार्ज कॅपद्वारे सुरुवात केली जाऊ शकते. यात जमा केलेल्या रकमेत दर वर्षी काही प्रमाणात वाढ होते.

कमीत कमी 12 वर्षापर्यंत वरील तीन मार्गाने गुंतवणूक करावी. 15 व्या वर्षापासून इक्विटी फंडमधून थोडी थोडी रक्कम डिपॉझिटमध्ये ट्रान्सफर करावी. त्यामुळे मुलाला गरज असेल त्या वेळी तुम्हाला जोखीम उचलण्याची गरज नाही. मुलगा 18 वर्षांचा होण्याच्या आत ते पैसे काढून घ्या. मुलगा 18 वर्षांचा झाल्यावर पालक त्या खात्यावर व्यवहार करू शकणार नाही. कारण आता मुलगाच ती खाती आणि पोर्टफोलियो ऑपरेट करेल. अशात पॅन कार्ड, केवायसीसारखे पेपरवर्क आधीच करून घ्यायला पाहिजेत. या समस्येपासून बचाव करण्यासाठी पालकांनी मुलांच्या खात्यावरील पैसे आधीच स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर केले पाहिजेत. या वेळेपर्यंत पीपीएफसुद्धा मॅच्युअर झालेले असेल व इक्विटी फंडची रक्कमही बरीच वाढली असेल.

लेखिका, सेंटर फॉर इन्व्हेस्टमेंट एज्युकेशन अँड लर्निंग, मुंबई. येथे एमडी आहेत. uma.shashikant@ dainikbhaskargroup.com