आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोन उत्पादनात चीन अव्वल स्थानावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजींग- स्मार्टफोनच्या उत्पादनात चीन जगातील सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून उदयाला आला आहे. गेल्या वर्षी एकट्या चीनमध्ये 200 दशलक्ष एवढय़ा स्मार्टफोनची निर्मिती करण्यात आली होती.

आयफोन, आयपॉड टच, आयपॅडवर चीनची अनेक अँप लाँच झाली आहेत. देशातील मोबाइल इंटरनेट बाजारपेठ 2015 पर्यंत 68 अब्ज डॉलर्सचा आकडा गाठेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मोबाइल इंटरनेटच्या वापर करणार्‍यांची संख्या 18 टक्क्यांनी वाढल्याचेही आकडे सांगू लागले आहेत.