आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी सायकल लंका, बांगलादेशमार्गे भारतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- चिनी सायकलला भारतात मागणी वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच कमी सीमा शुल्क आकारले जावे म्हणून चीनने श्रीलंका, बांगलादेशमधून सायकल भारतात पाठवण्याचा उद्योग सुरू केला आहे.

भारतातील काही आयातदार चीनच्या कमी किमतीच्या सायकलींची मागणी करत आहेत. त्यासाठी र्शीलंका, बांगलादेशचा मार्ग निवडला आहे. र्शीलंका, बांगलादेश यांच्याबरोबर भारताचा मुक्त व्यापार करार आहे. त्याचा फायदा घेऊन व्यापार्‍यांनी ही शक्कल लढवली आहे. चिनी उत्पादनाचा महापूर रोखण्यासाठी केंद्र सरकारने आयात कर 10 वरून 20 टक्क्यांवर नेला आहे. सायकलवरील कर तर 10 वरून 30 टक्क्यांवर गेल्याने आयातदारांनी ही शक्कल लढवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या मार्गाने भारतात चिनी सायकली येऊ लागल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. लुधियाना सायकलची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.

मेक्सिकोमध्ये कॅनडियन जोडप्याची हत्या
ग्वाडालाजारा (मेक्सिको)- चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात वृद्ध दांपत्याची हत्या झाल्याची घटना मेक्सिकोमध्ये उजेडात आली आहे. 84 वर्षीय पती आणि 72 वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. ओंटारिओ प्रांतात हे दांपत्य एकटेच राहत होते. सहा महिन्यांपूर्वीच हे दांपत्य अजिजिक शहरात राहायला आले होते.