आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी मोबाइलला पुन्हा जोर येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पुन्हा एकदा भारतीय बाजारात चिनी मोबाइल ब्रँड धुमाकूळ घालण्याची तयारी करत आहे. 2013-14 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 2 हजारांपेक्षा अधिक किंमत असलेल्या मोबाइल हँडसेटवर अबकारी शुल्कात 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आधी हे शुल्क फक्त 1 टक्का होते. यामुळे भारतीय व चिनी मोबाइल ब्रँडच्या किमतींत फरक पडणार आहे.

बँड्रेडच्या तुलनेत चिनी मोबाइल स्वस्त किमतीत उपलब्ध होतील. परिणामी ‘ग्रे’ मार्केटला पुन्हा चालना मिळण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख हँडसेट निर्माता कंपन्यांनीही ग्रे मार्केटमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याचा सूर आळवला आहे. यामुळे ब्रँडेड हॅँडसेट्सच्या विक्रीत मोठी घट होण्याची शक्यताही या कंपन्यांनी व्यक्त केली आहे. इंडियन सेल्युलर असोसिएशनचे अध्यक्ष पंकज मोहिंद्रू म्हणाले की, आधी ग्रे मार्केटवर नियंत्रण आणण्यासाठी ब्रँडेड हँडसेट्सवरील अबकारी कर एक टक्का करण्यात आला होता.

अशी आहे तरतूद
2 हजार रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या मोबाइल हँडसेटवरील अबकारी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. आधी हे शुल्क फक्त 1 टक्का होते. ते आता 5 टक्क्यांनी वाढवून 6 टक्क्यांवर नेण्यात आले आहे.