आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाच देणा-या कंपनीला २,७०० कोटींचा दंड, चीनमधील भ्रष्टाचार प्रकरणी कोर्टाचा निवाडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये औषधांची विक्री वाढवण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न ब्रिटिश कंपनीला चांगलाच महागात पडला आहे. चीनमधील कोर्टाने कंपनीला २ हजार ७ ९४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (जीएसके) असे कंपनीचे नाव आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील हा देशातील सर्वात मोठा दंड मानला जातो. जीएसकेने औषधांची विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांना लाच किंवा प्रलोभने देण्याचा फंडा सुरू केला होता. चांगसा पीपल्स कोर्टमध्ये बंद दरवाजा आड झालेल्या सुनावणीत हा निवाडा दिला. कंपनीचा चीनमध्ये कारभार पाहणा-या ब्रिटिश व्यवस्थापकास तीन वर्षांची कैद झाली आहे. त्याचबरोबर त्यांची चीनमधून हकालपट्टी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. लाच देऊन विक्री वाढवण्याचे काम करण्यासाठी कंपनीने पाच अधिका-यांची नियुक्ती केली होती. या अधिका-यांना दोन ते तीन वर्षांची कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे सर्व चिनी नागरिक आहेत. दरम्यान, जीएसकेने कंपनीच्या माफीनामा जारी केला.