आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China News In Marathi, Pune, Automobile, Divya Marathi

चीन पुण्यात ३० हजार ३२५ कोटींचा ऑटोमोबाइल पार्क उभारणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक पातळीवर दबदबा निर्माण करणारे महाराष्ट्रातील ऑटोमोबाइल क्षेत्र आता टॉप गिअरमध्ये धावणार आहे. चीन पुण्यात ऑटोमोबाइल पार्क उभारणार असून त्यात ५ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ३० हजार ३२३ कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. पुण्यात होणाऱ्या ऑटोमोबाइल पार्कमुळे औरंगाबादच्याही वाहननिर्मिती क्षेत्राला मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

चीनचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी १७ सप्टेंबर रोजी भारतात येत आहेत. त्या वेळी याची घोषणा होईल. ताजिकीस्तान, मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर त्यांचे भारतात आगमन होईल. भारतातील रेल्वे, मॅन्युफॅक्चरिंग आणि पायाभूत क्षेत्रात चीन ५ वर्षांत सुमारे १०० अब्ज डॉलर्स (सुमारे ६ लाख कोटी रुपये) डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.
तत्पूर्वी, मुंबईतील चीनचे वाणिज्य दूत लियू यूफा यांनी सांगितले की, आम्ही अध्यक्ष जिनपिंग यांच्या दौऱ्यात येत्या पाच वर्षांत भारतात सुमारे १०० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे आश्वासन देणार आहोत. ही गुंतवणूक औद्योगिक पार्कची उभारणी, रेल्वेचे आधुनिकीकरण, हायवे, बंदरे, वीजनिर्मिती, ऑटोमोबाइल, मॅन्युफॅक्चरिंग, अन्न प्रक्रिया आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात होईल.

असा असेल पुण्यातील पार्क
05 चाैरस िकमी क्षेत्रफळ
1 लाख जणांना यात रोजगार मिळणार

पुण्यातील औद्योगिक पार्क ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी असणार आहे. त्याचे क्षेत्रफळ ५ चौरस किलोमीटर राहणार आहे. त्याच्या उभारणीतून एक लाखावर रोजगारनिर्मिती होणार आहे. गुजरातमधील पार्क वीज उपकरणांच्या उत्पादनासाठी असेल. तामिळनाडूतही वस्त्राेद्योग व अन्न प्रक्रिया क्षेत्रासाठी औद्योगिक पार्क उभारणीची योजना आहे.

रेल्वेची बुलेट प्र"गती'
भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण, बुलेट आणि हायस्पीड रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी चीन ५० अब्ज डॉलर्सपेक्षा अिधक गुंतवणूक करेल. जुने रूळ बदलणे, स्थानकांचा विकास व मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांत मोठी गंुतवणूक होईल. तसेच उभारणी, विकास आणि रेल्वेमार्गांच्या देखरेखीसाठी चीनने काही रेल्वे कॉरिडॉर्स आपल्याकडे सोपवण्याची विनंती भारताला केली आहे.