नवी दिल्ली - चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारतभेटीच्या दुसऱ्या दिवशी १२ करार झाले. यात पुणे व अहमदाबादेत औद्योिगक पार्कचा समावेश आहे. पुण्याजवळ ऑटो पार्क उभारून चीन सुमारे साडेबारा अब्ज रुपयांची गुंतवणूक करेल. यामुळे ७ हजार रोजगार उपलब्ध होतील. जिनपिंगसोबत झालेल्या बैठकीत विकासासह सीमावाद उपस्थित करून मोदी यांनी चीनला या विषयावर भाष्य करण्यास भाग पाडले. जोवर दोन्ही देशांच्या हद्दी निश्चित होणार नाहीत; तोवर हे वाद होतच राहतील, असे जिनपिंग उत्तरले.
बेइकीकडून पुढाकार
चीनमध्ये ऑटो उत्पादनात आघाडीवरील बेइकी फोटॉन मोटार कंपनी पुण्याजवळ सुमारे १२५० एकरांत १२.५ अब्ज रुपयांचा ऑटो पार्क उभारणार आहे. त्याबाबत बेइकीचा एमआयडीसीसोबत करार झाला आहे.