आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CII Gives List Of 62 Big Projects Which Are Held Up

रखडलेल्या 62 बड्या प्रकल्पांची यादी ‘सीआयआय’ कडून सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पायाभूत क्षेत्रातील रखडलेले प्रकल्प मार्गी लागूत अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने (सीआयआय) पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून सीआयआयने अलीकडेच अशा थंड पडलेल्या 62 प्रकल्पांची यादी प्रकल्प व्यवस्थापन गटाकडे सुपूर्द केली

प्रत्येक प्रकल्पाचा आकार एक हजार कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असून एकूण गुंतवणूक 3.93 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यातील 27 प्रकल्प एकट्या ऊर्जा क्षेत्रातील आहे. यामध्ये 33 हजार कोटी रुपयांचे जैतापूर ऊर्जा प्रकल्प, रिलायन्स पॉवरचा झारखंड एकात्मिक ऊर्जा प्रकल्प तसेच टाटा पॉवर, एस्सार, लॅन्को आणि अदानी समूह या कंपन्यांच्याही अनेक मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे.

खाणकाम आणि अन्य मुद्द्यांबरोबरच भूसंपादन, इंधन पुरवठा आणि पर्यावरणात्मक मंजुरी हे प्रकल्प राबवण्यात येणार्‍या प्रमुख अडचणी असल्याचे मत प्रवर्तकांनी व्यक्त केले आहे.आर्थिक वृद्धीला चालना देण्याच्या दृष्टीने किमान 50 मोठ्या प्रकल्पांची जलदगतीने अंमलबजावणी करावी, अशी विनंती सरकारकडे करण्यात आली असल्याचे सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी स्पष्ट करतानाच प्रकल्प व्यवस्थापन गटाने
गेल्या दोन आठवड्यांत पायाभूत क्षेत्रातल्या 17 मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या मंजुरीमुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होण्याचा आशावाददेखील त्यांनी व्यक्त केला. ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांव्यतिरिक्त सीआयआयने आपल्या यादीमध्ये अन्य क्षेत्रातील प्रकल्पांचादेखील समावेश केला आहे. पर्यावरणात्मक मुद्द्यांमुळे जलविद्युत प्रकल्पांना सर्वात जास्त विलंब झाला असून त्याच्याच बरोबर स्थानिकपातळीवरील विरोध आणि वन विभागाकडून मंजुरी मिळण्यास देखील अडचणी येत आहे. रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांमध्ये भूसंपादन हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे सीआयआयने म्हटले आहे. या अगोदर मे महिन्यात फिक्कीनेदेखील मंत्रिमंडळ सचिवांना लांबणीवर पडलेल्या 50 पेक्षा जास्त प्रकल्पांची यादी सादर केली असून या प्रकल्पांच्या गुंतवणूक एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. रस्ते, महामार्ग, धातू , खाणकाम, तेल आणि वायू व ऊर्जा या क्षेत्रातील हे प्रकल्प आहेत.