आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- बँकिंग आणि वित्त क्षेत्रासाठी माहिती तंत्रज्ञान प्रणाली विकसित करणार्या येथील 'सिनेक्रोन' कंपनीने सिंगापूर आणि अमस्टरडामधील 'डबल इफेक्ट' ही व्यवस्थापन सल्ला सेवा क्षेत्रातील कंपनी ताब्यात घेतली आहे.
भांडवली बाजार, विमा डिजिटल माध्यमे या क्षेत्रात वार्षिक सरासरी 35 टक्के वाढ असलेल्या सिनेक्रोनला त्यामुळे आशिया आणि प्रशांत विभागातील देशात सेवा विस्तार करणे सोपे जाणार आहे .
याबाबत माहिती देताना मुख्याधिकारी फैझल हुसेन म्हणाले की, सिनेक्रोन ही आर्थिक सेवा उद्योगांवर केंद्रित असलेली जागतिक आयटी कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. जी डाव पेचात्मक संभाषण आणि अंमलबजावणी यामध्ये विशेषज्ज्ञता प्राप्त आहे. डबल इफेक्टच्या संपादनाने, आमच्या डावपेचात्मकरित्या मार्गदर्शन आणि आर्थिक संस्थांना, अत्याधुनिक व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान सल्लागार क्षमतांद्वारे रुपांतरीत करण्याच्या आकांक्षेला मजबुत केले आहे.
संपादनानंतर डबल इफेक्ट हि व्यक्तीगत कंपनी म्हणुन कार्य करेल आणि ती त्यांच्या ग्राहकांना संयुक्त मुल्य प्रस्ताव घेण्याचे चालु ठेवेल. संपादनाविषयी बोलताना, डबल इफेक्टचे संस्थापक बास हैजनेन आणि पाब्लो वॅन डेन बॉश्च म्हणाले की, आर्थिक सेवा उद्योग हा गंभीर वळणावर आहे आणि आमचे सिनेक्रॉनसोबतचे संबंध नक्कीच फायदा देणारे ठरतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.