आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरी विद्युत ग्राहकांसाठी शंभर टक्के मीटरिंग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील ऊर्जा क्षेत्राला संपूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडून देशातील 18 उद्योगपतींना मिळाल्यानंतर ऊर्जा सचिव पी. उमाशंकर यांनीही शहरी वीज ग्राहकांसाठी शंभर टक्के मीटरिंग यासह राष्ट्रीय विद्युत निधीअंतर्गत डिस्कॉमला वित्त पुरवठा करण्यासाठी व्याजात सवलत अशा विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
मीटरिंग हा प्रत्येक शहरी गाहकाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न असून वीज कंपन्यांसाठी व्याज सवलत देणे तितकेच अगत्याचे असून त्यासाठीच राष्ट्रीय विद्युत निधी उभारण्यात आला आहे. हा निधी सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षांत वीज कंपन्यांसाठी 25 हजार कोटी रुपये उपलब्ध होण्याची अपेक्षा असल्याचेही उमाशंकर यांनी या वेळी सांगितले. बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत 76 हजार मेगावॅट विजेची भर पडेल, असा अंदाज असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकट्या विद्युत निर्मितीमध्ये 6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असा अंदाज उमाशंकर यांनी या वेळी व्यक्त केला. इलेक्रामाचे अध्यक्ष इंद्र मेनन, ‘इमा’चे अध्यक्ष रमेश चांडक, ऊर्जा मंत्रालयाच्या वितरण विभागाचे संयुक्त सचिव देवेंदर सिंग यांनी या वेळी आपली मते व्यक्त केली.
बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या कार्यकारी गटाच्या अंदाजानुसार वीज वितरणांतर्गत नवीन विद्युत वाहिन्या आणि उपकेंद्रांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे.
गेल्या पाच वर्षांत एक राष्ट्र एक ग्रीडचे स्वप्न जवळपास पूर्ण झाले. विद्युत निर्मिती क्षमतेत अतिरिक्त भर घालण्याच्या योजनेबरोबरच अंतिम ग्राहकापर्यंत वीज पोहोचण्यासाठी विद्युत पारेषण आणि वितरण सुसज्ज करण्याचा विचार आहे.