आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन पेमेंट करणे ग्राहकांना वाटते अडचणीचे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ई-कॉमर्समुळे ऑनलाइन पेमेंटच्या अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या असल्या तरीही आपल्या क्रेडिट कार्डाचा तपशील देणे अनेक ग्राहकांना रुचत नाही. त्यामुळे बहुतांश ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट करणे अडचणीचे वाटत असल्याचे मत ‘ई- बिलिंग सोल्युशन्स’चे व्यवस्थापकीय संचालक लॉरेंट धायर यांनी व्यक्त केले.देशात इलेक्ट्रॉनिक कॉमर्सला गती मिळत असली तरीही बहुतांश ग्राहक अजूनही ऑनलाइन पेमेंट करण्याऐवजी वस्तू प्रत्यक्ष हातात पडल्यानंतरच त्याची रक्कम देणे पसंत करीत असल्याचे धायर म्हणाले.तरुण उद्योजकांनी एकत्र येऊन 2005 मध्ये ई- बिलिंग सोल्युशन्स ही कंपनी सुरू केली. त्यानंतर ओगॉन पेमेंट सर्व्हिसेसने ताबा मिळवला.

ऑनलाइन शॉपिंग बाल्यावस्थेत
ई-कॉमर्सचे प्रमाण वाढले असले तरी प्रत्यक्षात ते कॅश ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून होत असल्याने त्यासाठी पेमेंट गेटवेची गरज लागत नाही. पेमेंट गेटवेची आवश्यकता ही क्रेडिट कार्डसारख्या ऑनलाइन माध्यमातून खरेदी करतानाच लागते, असेही ते म्हणाले. आपल्या देशात ऑ नलाइन शॉपिंग अद्यापही बाल्यावस्थेत असले तरी पुढील काही वर्षांत त्यात लक्षणीय वाढ होऊन 2015 पर्यंत ऑ नलाइन उद्योगाची उलाढाल 34.2 अब्ज डॉलर्सवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.