आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब गजब - कापडी युद्ध वाहने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्पना करा, एक 10-15 किलो वजनाची बॅग घेऊन एक व्यक्ती मैदानात येते आणि तुम्हाला सांगते की या बॅगेत युद्धातला रणगाडा आहे, तर तुम्ही विश्वास ठेवाल? नाही ना, पण हे खरे आहे. ही आहेत रशियातील संरक्षण खात्याने तयार केलेली प्रचंड आकाराची खेळणी व तीही कापडाची. बॅगेतील हे घडी केलेले खेळणे बाहेर काढून त्यात फायरपंपच्या साह्याने हवा भरली की अवघ्या तीन मिनिटांत त्याचे रणगाडे, ट्रक्स, मिसाइल्स वा रॉकेट लाँचरमध्ये रूपांतर होते. लांबून पाहिले असता हे इतके खरेखुरे दिसते की, प्रत्यक्ष वाहनच वाटावे. अर्थात, रशियन संरक्षण दलाचा मुख्य उद्देशदेखील हाच आहे. विशेष म्हणजे रडारची यंत्रणादेखील हे खरे आहे की खोटे हे ओळखू शकणार नाही, असे तंत्रज्ञान यात वापरण्यात आले आहे. याला ‘इनफ्लॅटेबल वेपन्स’ असे म्हटले जाते. हे रणगाडे, ट्रक्स, मिसाइल, रॉकेट लाँचर्स फक्त शोभेचे नाहीत, तर त्यांच्या सर्व हालचाली या खर्‍याखुर्‍या असतात. युद्धात शत्रूला चकवण्यासाठी याचा उपयोग होतो. आकाशातून टेहळणी करणार्‍या विमानांना हे सर्व खरे दिसते आणि त्यांना खरे मानून उद्ध्वस्त केले, तर त्यांचा दारूगोळा निष्कारण वाया जातो. अर्थात, आज जरी हे तंत्र उपयोगाचे असले तरी आधुनिक तंत्रज्ञान इतक्या वेगाने पुढे जात आहे की यावरही उपाय शोधला जाईल.