आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी लोकसभेची! सीएनजी 15 तर पीएनजी पाच रुपयांनी स्वस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र सरकारने महागाईने बेजार झालेल्या जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनसी) दरात प्रत‍िकिलो 15 रुपयांनी तर पाईपद्वारा पुरवठा केला जाणारा नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरात घन मीटर पाच रुपयांनी कपात करण्याचा निर्णय आज (सोमवारी) घेण्यात आला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (आयजीएल) आणि अन्य सिटी गॅस वितरण कंपन्यांनी कमी किंमतीत गॅस उपलब्ध करून देण्‍याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मोईली यांनी सांगितले. नवे दर आजपासून लागू करण्‍यात आल्याची त्यांनी घोषणा केली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारतर्फे देशातील जनतेला खुश करण्‍यासाठी निर्णय घेतले जात असल्याचेही म्हटले जात आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 107 रूपयांनी कपात केली आहे. मात्र, डिझेलच्या दरात प्रतिलीटर 50 पैशांने वाढ केली आहे. नवे दर शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू करण्‍यात आले आहेत. पेट्रोलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.

पुढील स्लाईड्‍वरवर वाचा, वर्षाकाठी मिळणार 12 अनुदानित ‍गॅस सिलिंडर...