आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल इंडियातील निर्गुंतवणूक ३५८ रु. दराने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारने कोल इंडियातील आपला १० टक्के हिस्सा विक्रीसाठी समभागामागे ३५८ रुपये किमान दर (फ्लोअर प्राइस) निश्चित केला आहे. गुरुवारी मुंबई शेअर बाजारात कोल इंडियाचे समभाग ३७४.१५ रुपयांवर बंद झाले. अशा रीतीने किमान दरापेक्षा गुरुवारचा बंद भाव ४.३ टक्क्यांनी कमी आहे. ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून शुक्रवारी निर्गुंतवणूक होणार आहे. यातून सरकारला २२,६०० कोटी रुपये मिळण्याची आवश्यकता आहे.

आर्थिक विषयाच्या मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) बुधवारी ओएफएसच्या माध्यमातून निर्गुंतवणुकीला मान्यता दिली होती. या महारत्न कंपनीत सरकारची सुमारे ९० टक्के हिस्सेदारी आहे. निर्गुंतवणूक प्रक्रियेत ५ टक्के (३१.५८ कोटी) समभाग विक्रीसाठी ठेवण्यात येतील. मागणी राहिल्यास आणखी पाच टक्के समभागांची विक्री करण्यात येणार आहे. समभाग विक्री सकाळी नऊ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत चालणार आहे. डिसंेबरमध्ये सरकारने सेलमधील ५ टक्के हिस्सा विक्रीतून १७०० कोटी रुपयांची उभारणी केली होती.
संघटनांकडून विरोध : कोल इंडियातील विविध कामगार संघटनांनी या पब्लिक ऑफरला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी लाक्षणिक विरोधानंतर संपाचा इशारा संघटनांनी दिला आहे.

इंडियन आइल कॉर्पोरेशन, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, नॅशनल अॅल्युमिनियम. सरकारने नाल्को आणि आयओसीमधील प्रत्येकी १० टक्के हिस्सा आणि भेल व डीसीआयएलमधील आपला प्रत्येकी ५ टक्के हिस्सा विक्रीची योजना आखली आहे. जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक असणाऱ्या कोल इंडियामध्ये सरकारची ८९.६५ टक्के हिस्सेदारी आहे. ऑक्टोबर २०१० मध्ये या कंपनीचा आयपीओ आला होता. तेव्हा सरकारने १५,१९९ कोटी रुपये उभारले होते. चालू आर्थिक वर्षात सरकारकडून निर्गुंतवणूक होणारी कोल इंडिया ही दुसरी कंपनी राहील.गुंतवणूकदारांसाठी निर्गुंतवणुकीत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २० टक्के समभाग राखीव असतील. त्यावर ५ टक्के सवलतही मिळणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी २० टक्के समभाग खरेदी केल्यास सरकारला ४,००० कोटी रुपये मिळतील.
कोल इंडियातील निर्गुंतवणुकीत लक्ष्य साध्य झाले तर ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक विक्री (पब्लिक ऑफर) ठरणार आहे. या पूर्वीचा विक्रमही कोल इंडियाच्या नावावर आहे. चार वर्षांपूर्वी २०१० मध्ये कंपनीचा १५,००० कोटी रुपयांचा आयपीओ आला होता. त्या वेळी प्रति शेअर २४५ रुपये दर होता आणि ही ऑफर १५ पटीने सब्सक्राइब झाली होती.