आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cobrapost Case: Reserve Bank Filed Chargesheet Aagainst Three Banks

कोब्रापोस्ट प्रकरण: ‘त्या’ तीन खासगी बँकांना रिझर्व्ह बँकेने ठोठावले दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केवायसीचे मानक आणि अँटी- मनी लाँडरिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अ‍ॅक्सिस, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या खासगी क्षेत्रातील बँकांना रिझर्व्ह बँकेने दंड ठोठावला. कोब्रापोस्ट या ऑनलाइन पोर्टलने या बँकांचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला होता. या प्रकरणी अ‍ॅक्सिस बँकेला पाच कोटी रुपये, एचडीएफसी बँकेला 4.5 कोटी रुपये, तर आयसीआयसीआय बँकेला एक कोटी रुपये दंड भरण्यास आरबीआयने सांगितले.


या प्रकरणातील प्रत्येक बाबीची कसून तपासणी केल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले. या प्रकरणात बरेच तथ्य आढळून आले. अनेक वेळा नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे आर्थिक दंड ठोठावण्याचा निर्णय घेतल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.


मार्च आणि एप्रिल 2013 मध्ये अ‍ॅक्सिस, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकांत ग्राहक जाणून घ्या (नो युवर कस्टमर - केवायसी) तसेच पैशांचे गैरव्यवहार झाल्याचे कोब्रापोस्ट या ऑनलाइन पोर्टलने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणले होते. याची दखल घेत रिझर्व्ह बँकेने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. रिझर्व्ह बँकेने या बँकांची कार्पोरेट कार्यालये आणि निवडक शाखांतील खात्यांची तपासणी केली. तसेच अंतर्गत सुरक्षा व्यवस्था, मंजुरी व्यवस्था (कॉम्पलायन्स सिस्टिम) आणि प्रक्रिया पध्दतीची छाननी केली. काळा पैसा विरोधी नियम आणि केवायसी बाबत भँकांनी नियम पाळले की नाही हे पाहण्यासाठी ही सूक्ष्म तपासणी करण्यात आली.


कोब्रापोस्टच्या दाव्यात काही अंशी तथ्य असल्याचे या तपासणीत आढळून आले. त्यामुले रिझर्व्ह बँकेने या बँकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. यातील प्रत्येक प्रकरणाची छाननी केल्यानंतर त्यातील तथ्यानुसार या तीनही बँकांना दंड ठोठावण्यात आला.


काळ्या पैशाबाबत स्वतंत्र चौकशी : रिझर्व्ह बँक
या तिन्ही बँकांनी केवायसी व इतर नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले. काळा पैशाबाबतच्या दंडकांचे उल्लंघन केले किंवा नाही हे अजमावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेकडून तपास करावा, असा शेरा रिझर्व्ह बँकेने दिला आहे.


चौकशीत काय आढळल
० मध्यवर्ती बँकेने दिलेल्या काही सुचना व नियमांचे सातत्याने उल्लंघन
० सहकारी बँकांकडून काढण्यात आलेल्या अ‍ॅट पार चेकच्या बाबतीत घ्यायची काळजी व नियम बँकांनी पाळले नाहीत
० केवायसी तसेच एएमसीबाबतच्या नियमांना फाटा देण्यात आला.
० केवायसी बाबत वेळोवेळी खातेदारांकडून माहिती अद्ययावत करण्याकडे कानाडोळा
० थर्ड पार्टीकडून होणा-या 50 हजारांपेक्षा जास्त रकमांच्या व्यवहारात निष्काळजीपणा
० काही निवासी भारतीयांच्या (एनआरओ) खात्यांबाबत फॉर्म 60 व 61 किंवा पॅन क्रमांकांचा अभाव.


कोणाला किती दंड
5 कोटी रुपये अ‍ॅक्सिस बँक
4.5कोटी रुपये एचडीएफसी
5 कोटी रुपये आयसीआयसीआय