आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेअर बाजारात तेजीचा रंगोत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या सात सत्रांपासून सुरू असलेल्या मंदीची होळी करत गुंतवणूकदारांनी मंगळवारी मुंबई शेअर बाजारात तेजीचा रंगोत्सव साजरा केला. सेन्सेक्स 23.11 अंकांनी वाढून 18,704 अंकांवर, तर निफ्टी 7.75 अंकांनी वधारत 5,641.60 या पातळीवर बंद झाला.

मंगळवारी बाजारात चढ-उताराचे हिंदोळे दिसून आले. कधी समभाग विक्रीचे पारडे वर, तर कधी खरेदीचे पारडे खाली अशी स्थिती होती. त्यात एचडीएफसी, आयटीसी, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, टीसीएस आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या समभागांना गुंतवणूकदारांनी पसंती दिली. एफएमसीजी समभागात विक्री दिसून आली. आशियातील बहुतेक बाजारांत संमिश्र वातावरण होते. युरोपातील बाजारात तेजीचा कल होता.