आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅक्टिव्हा आयमध्‍ये कम्बाइंड ब्रेक सिस्टिम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होंडाने वजन कमी करून नवी अ‍ॅक्टिव्हा आय बाजारात आणली आहे. स्कुटरची बॉडी प्लास्टिकची आहे. नवीन स्टायलिंग आणि कॉम्पॅक्ट डायमेन्शन आहेत. हेडलाइट हँडलबारवरच आहे. समोर उभे टर्न सिग्नल इंडिकेटर आहेत. पायलट लॅम्पसोबतच हाताची ग्रिप, स्विच, लिव्हर आणि मिररचा लूकही चांगला आहे. सीटखाली सामान ठेवायला भरपूर जागा आहे. सोबतच रायडर सीटखाली एक हूक देण्यात आले आहे.इंजिन मजबूत आहे. इको तंत्रज्ञानामुळे इंधनबचत होते. वेग कितीही वाढवला तरी व्हायब्रेशन होत नाही. वजन 103 किलो. सीबीएस (कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टिम) आहे. ती अत्यंत प्रभावीपणे काम करते.