आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coming Year Philips Starts Another 20 Store In India Including Maharashtra

आगामी वर्षभरात फिलिप्‍सचे राज्‍यासह देशभरात 20 नवीन स्‍टोअर्स होणार सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आकर्षक दिव्यांची (डेकोरेटिव्ह लायटिंग) बाजारपेठ भारतात वेगाने वाढत असून फिलिप्स इंडियाची उत्पादने चीनमधून आयात केल्या जात असलेल्या बेभरवशाच्या उत्पादनांना पर्याय ठरत आहेत, अशी माहिती फिलिप्स लायटिंग इंडियाचे संचालक सुमित जोशी यांनी पत्रकारांना दिली.

संघटीत क्षेत्रात डेकोरेटिव्ह लायटिंग उत्पादने विकणारी फिलिप्स इंडिया ही एकमेव कंपनी आहे. लष्कर भागात महात्मा गांधी रस्त्यावर पुण्यातील दुसरे आणि देशातील 86 वे स्टोअर सुरु झाले आहे. त्यानिमित्त कंपनीच्या आगामी योजनांची माहिती देताना जोशी म्हणाले, की प्रकाश योजना आकर्षक असावी अशी मागणी वाढते. कारण नव्या पद्धतीच्या घरांचा तो अविभाज्य भाग बनतो आहे. 2009 मध्ये आम्ही ही उत्पादने काही प्रमाणात आयात करून विकण्यास प्रारंभ केला आणि आता आमचा व्यवसाय दरवर्षी 100 टक्के वाढतो आहे. वाढता मध्यमवर्ग आणि त्यांच्या घरातील प्रकाश योजनेविषयी बदलत्या संकल्पना हे यामागचे कारण आहे. त्यातही दर सहा महिन्यांनी मागणीचे स्वरूप बदलते आहे.

बदलत्या गरजा पाहून आम्ही डेकोरेटिव्ह लायटिंग उत्पादनांची रचना सतत बदलत आहोत. नोइडातील विकास केंद्रात त्यावर सतत काम सुरु आहे. चीनी आयात स्वस्त असली तरी त्यांचा दर्जा खराब आहे. त्यामुळे ग्राहक आमच्याकडे वळतो आहे. अमेरिका आणि युरोपीय देशानंतर भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची बाजारपेठ बनली आहे. सध्या ही उत्पादने बनवताना 50 टक्के स्थानिक माल आम्ही वापरत आहोत. हे प्रमाण वाढत राहील. आमची उत्पादने वीज बचत करत असल्याने ग्राहक आणि देश दोन्हीचा फायदा होतो आहे.

चालू आर्थिक वर्षात आणखी 20 नवी स्टोअर सुरु केली जाणार असून त्यात महाराष्ट्रातील दहा शहरे असतील. ते म्हणाले, की पुण्यात आणखी पाच स्टोअर सुरु केली जातील. सांगली, सातारा, नाशिक, नगर, अकोला, अमरावती, सोलापूर, औरंगाबादमध्ये येत्या काही महिन्यात विस्तार केला जाणार आहे.

सध्या उत्पादनाच्या किमतीची रेंज 575-60 हजार रुपये अशी आहे. राज्यनिहाय किमती वेगळ्या असल्या तरी वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाल्यास आमच्यासारख्या कंपन्यांना व्यवसाय करणे सुलभ होणार आहे असेही त्यांनी सांगितले.