आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Companies Review News In Marathi, Business, Recession, Divya Marathi

कंपन्या घेणार लाभ धोरणाचा फेरआढावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महागाईचा चढता कल आणि आर्थिक मंदी लक्षात घेता जवळपास 60 टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्या पुढील 12 महिन्यांत आपल्या कर्मचा-यांच्या लाभ धोरणाचा आढावा घेण्याची शक्यता एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.
कर्मचा-यांना मिळणा-या लाभ खर्चात झालेली वाढ आणि कर्मचा-यांना त्यांना देण्यात येणा-या लाभाचा पुरेशा प्रमाणात फायदा करून घेता येत नसल्याने देशभरातील कंपन्या या लाभ धोरणाचा आढावा घेणार असल्याचे टॉवर वॉट्सन या जागतिक पातळीवरील व्यावसायिक सेवा कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे.


टॉवर वॉट्सनच्या देशातील कर्मचा-यांना मिळणा-या लाभांचा कल कसा आहे हे जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात प्रत्येक तीन भारतीय कर्मेचा-यांच्या मागे एक कर्मचारी आपल्या एकूण वेतनापैकी 20 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम लाभांवर खर्च करतो. परंतु जवळपास 43 टक्के कर्मचारी त्यांना मिळणा-या लाभांना पुरेशा प्रमाणात मूल्य देऊ शकत नसल्याचे या अहवालात दिसून आले आहे. आर्थिक मंदी, वाढती महागाई आणि कर्मचारी लाभाचा वाढता खर्च लक्षात घेता लाभांचा जास्तीत जास्त पर्याप्त वापर करणे हे कर्मचा-यांसाठी जास्त महत्त्वाचे ठरले असल्याचे मत टॉवर वॉट्सन इंडियाचे संचालक (लाभ) अनुराधा सिरम यांनी सांगितले. प्रतिभावंत कर्मचारी मिळणे कंपन्यांसाठी महत्त्वाचे असल्याने सध्या तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा वेळी कर्मचारी लाभ हे कंपनीतील प्रतिभावंत कर्मचा-यांना टिकवून ठेवण्यासाठी तसेच कर्मचारी मूल्य वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे हत्यार ठरले असल्याकडेही सिरम यांनी लक्ष वेधले.
येणा-या काळात कंपन्या एकच लाभ सर्व कर्मचा-यांना लागू करण्याऐवजी हे लाभ त्यांच्यासाठी अधिक सुटसुटीत आणि लाभदायक कसे ठरतील याकड लक्ष देतील.