आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंपनी मुदत ठेवीमधील गुंतवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब-याच कालावधीपासून भारतीय गुंतवणूकदारांना फिक्स व्याजदर गुंतवणूक आणि त्यातील सुरक्षा ही सर्वात जास्त आकर्षित करणारी संकल्पना आहे. सर्वसाधारणपणे एका व्यक्तिच्या बचतीच्या 60 टक्के रक्कम फिक्स डिपॉझिटचा (मुदत ठेव) मार्ग निवडते. तथापि मागील काही वर्षात आपण बँकांच्या व्याजदरात उतार चढाव बघितला. भारतात सद्य:स्थितीला न्यूनतम व्याजदर हा 9 टक्के आहे. मागील एका दशकातील आकडेवारी पाहता 2000 ते 2012 पर्यंतचे सरासरी प्रमाण 6.49 टक्के होते, तर ऑगस्ट 2000 मध्ये 14.50 टक्के हा सर्वाधिक व्याजदर व एप्रिल 2009 मध्ये 4.25 टक्के हा सर्वात कमी व्याजदर होता. ही सर्व परिस्थिती बघता गुंतवणूकदारांना दुसरे गुंतवणुकीचे पर्याय, जसे की पोस्ट ऑफिस गुंतवणूक किंवा कंपनी फिक्स डिपॉझिट हा पर्याय निवडता येईल.
कंपनी फिक्स डिपॉझिट ही अशी एक ठेवी आहे ज्यात गुंतवणूक ही कंपनीकडे एका ठराविक कालावधी व ठरावीक व्याजदरावर ठेवली जाते. ही रक्कम कंपनीला भांडवल म्हणून वापरायला मिळते. म्हणून या ठेवीवरील व्याजदर जास्त प्रदान केला जातो. शेअर्ससारख्या अनिश्चित गुंतवणूक क्षेत्रात जोखीम न उचलू इच्छित असलेल्या गुंतवणूकदारास कंपनी डिपॉझिट हा एक उत्तम पर्याय आहे. पण तज्ज्ञांच्या मते, जशी शहानिशा शेअर्समध्ये गुंतवणूक करतााां आवश्यक आहे. तशीच शहानिशा कंपनी डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करताना पण आवश्यक आहे.
गुंतवणूक करताना घ्यावयाची खबरदारी
काय करावे :
1. क्रेडिट रेटिंग चेक करणे : सगळ्यात महत्त्वाचे सूचक कंपनीत किती जोखीम आहे हे रेखांकित करते. ए ए ए रेटिंग सर्वोत्तम सुरक्षितता व कंपनीची वित्तीय स्थिती आणि वित्तीय दायित्व दर्शवते. सरळ भाषेत म्हणावयाचे झाल्यास, ए ए ए रेटिंग हे दर्शवते की तुमची मुद्दल आणि तुम्हाला मिळणारा व्याजदर दोन्ही खात्रीशीर आहे. इक्रा आणि क्रिसील ह्या भारतातील दोन मानांकीत संस्था आहेत ज्या कंपनीचा संपूर्ण अभ्यास करून त्यांना रेटिंग देतात.
2. प्रमोटरची विश्वासाहर्ता चेक करणे : कंपनी उभी करण्यात आणि बुडवण्यात प्रमोटरचा महत्त्वाचा वाटा असतो म्हणून प्रमोटरची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे असते. याला एक सर्वोत्तम उपाय म्हणजे ब्ल्यू चिप कंपनीत गुंतवणूक करणे.
काय करू नये :
1) जास्त व्याजदरांकडे आकर्षित होणे : एखादी कंपनी जास्त प्रमाणात व्याज देत असेल तर तो चिंतेचा विषय आहे. ( उदा : 14 ते 15 टक्के ) कंपनीमधील जोखीम जाणूनच कंपनी जास्त व्याजदर प्रदान करते. तर जास्त व्याजाच्या हव्यासापायी आकर्षिले जाऊ नका. कारण जेथे जास्त परतावा तेथे जास्त जोखीम असते हे आपणास ठाऊकच आहे.
2) जुने परतावे आणि कामकाज तपासायला विसरू नये : जुना परतावा हा भविष्यातील परतावा दर्शवत नसेल तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गुंतवणूकदाराने कंपनीचे जुने पेमेंट रेकॉर्ड तपासणे गरजेचे आहे.
3) नियामक संस्थेकडे मदत मागण्यात संकोच करू नका : नियामक संस्था धोका किंवा जनतेच्या पैशाचा गैरवापर करणा-या कंपन्यांवर, म्युच्युअल फंड यांच्यावर लक्ष ठेवून असतात. कंपनी बुडीत निघाली तर गुंतवणूकदार संबंधित नियामक संस्थेकडे तक्रार नोंदवू शकतो. कंपनी ही शेअर बाजारात लिस्टेड असेल तर सेबीकडे तक्रार करता येते. कंपनी निर्माणक्षेत्र किंवा गैरबँकिंग कंपनी असेल तर अनुक्रमे डिपार्टमेंट ऑफ कंपनी अफेअर्स अथवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तक्रार नोंदवता येते.
सर्वोत्तम कंपनी डिपॉझिट स्कीम कशी निवडाल
1. ज्या कंपन्यांना रेटिंग नाही अशाकडे दुर्लक्ष करा.
2. दिलेल्या मानकांपैकी सर्वोत्तम प्रतिष्ठा असलेल्या कंपनी डिपॉझिटची निवड करा.
3. एकदा का कंपनी ठरवल्यानंतर, अशी स्कीम निवडा जी तुम्हाला उत्तम परतावा देईल. जर तुम्हाला रेग्युलर इन्कमची गरज नसल्यास (क्युमिलिटिव्ह) स्कीमची निवड करा, जेणेकरून सगळ्यात शेवटी एकरकमी पैसे मिळतील.
4. 1 ते 3 वर्षांच्या कमी कालावधीसाठी करणे कधीही चांगले. यात तुम्ही ना फक्त कंपनीच्या रेटिंगकडे लक्ष देऊ शकता, तर काही आपत्कालीन स्थिती ओढवली तर पैसा वापरू शकता.
5. तुमच्या अर्थसल्लागाराचा (फायनान्शियल प्लॅनर) व गुंतवणूक विश्लेषकाचा (इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर) सल्ला घ्या. त्यांना बायपास करून गुंतवणूक करू नका
काही कंपन्यांच्या ठेव योजना :
1.श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड - व्याजदर(10.75टक्के), कालावधी(3 वर्षे), रेटिंग-क्रिसिल: एफ ए ए प्लस.
श्रीराम उन्नती - इक्रा: एम ए ए प्लस
2- हुडको - 9.4 टक्के, 3 वर्षे, क्रिसिल: एफ ए ए ,
इक्रा : एम ए ए
3- एचडीएफसी - 9.5 टक्के, 3वर्षे, क्रिसिल - एफ ए ए ए, इक्रा - एम ए ए ए.