आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता, कंपन्यांसाठी ‘मॅजिक’ ठरणार आधार क्रमांक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नागरिकांना खास ओळख संख्या क्रमांकासाठी देशभरात आधार कार्ड योजना राबवण्यात येत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येणारा आधार क्रमांक हा एकमेवद्वितीय असेल. यामुळे सर्वसामान्य जनताच नव्हे तर कंपन्या आणि सरकारलाही प्रचंड मोठा फायदा होणार आहे.
आधार योजनेत देशवासीयांना 12 अंकांचा एक अद्वितीय क्रमांक देण्यात येणार आहे. यामुळे देशातील सर्व गरीब जनतेला स्वत:ची ओळख मिळणार आहे. शहरी असो वा गावातील, सर्व जनतेला हा आधार क्रमांक देण्यात येणार आहे. प्रत्येकाची बायोमेट्रिक ओळख निश्चित करणा-या आधार क्रमांकामुळे जनतेला बँकेत खाते उघडण्यास विविध कागदपत्रे जमवण्यासाठी धावाधाव करावी लागणार नाही. तसेच सरकारकडून स्वस्त दरांत धान्य घेणा-या जनतेलाही आधार क्रमांकाचा मोठा फायदा होणार आहे.
सध्या दलाल आणि भ्रष्ट कर्मचा-यांमुळे या जनतेपर्यंत सरकारच्या योजना आणि सोयीसुविधा पूर्णपणे पोहोचत नाही. सरकारकडून राबवल्या जाणा-या मनरेगासारख्या सामाजिक कल्याण योजनांद्वारे गरीब जनतेचा विकास सुनिश्चित होण्यास आधार क्रमांक मोठी भूमिका बजावणार आहे. कागदांवर नकली कामगार दाखवून योजनेतील बहुतांश निधी खिशात घालण्याचे काम भ्रष्ट कर्मचा-यांकडून होते. यामुळे ग्रामीण लोकांसाठी आकर्षक योजना सुरू करूनही त्यांचा फायदा गरजवंतांपर्यंत पोहोचत नव्हता. आता आधार कार्डावरील बायोमेट्रिक क्रमांकामुळे भ्रष्ट व्यवहारांना हेराफेरी करण्यास वावच राहणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. आधार क्रमांकामुळे कमी शिक्षण असलेली जनता कामासाठी आपले घर सोडून दुस-या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची आधार ओळखपत्रामुळे अडवणूक होऊ शकणार नाही.
आधार कार्डमुळे कंपन्यांच्या मागील कटकटीही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
गरिबांना होईल फायदा
सर्वसामान्यांना बँकेत खाते उघडण्यास अडचणी येणार नाहीत.
क्रमांकामुळे ग्राहकांना कर्ज मिळण्यात आणि कंपन्यांना ते देण्यात सुविधा निर्माण होईल
सरकारकडून राबवल्या जाणा-या स्वस्त धान्य आणि इतर योजनांना यश मिळणार
भ्रष्ट कर्मचारी सरकार आणि जनतेला फसवू शकणार नाहीत.
कंपन्या व ग्राहकांना असा होईल लाभ
कर्ज घेण्यास आणि त्याची परतफेड करण्यास सक्षम असणा-यांना बँका सहजपणे शोधू शकतील. तसेच त्यांना कमी व्याजदरांचीही आॅफर मिळू शकेल.
व्यवसायाच्या मोठ्या शक्यता असलेल्या ग्राहकांना शोधणे सहज शक्य होईल.