आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, किती वर्षानंतर आणि केव्हा काढता येतात PF चे पैसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हे तर सर्वांनाच माहित आहे की, पगार घेणार्‍या व्यक्तीसाठी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) यासारखी सर्वात चांगली सेव्हींग स्कीम कोणतीच नाही. मात्र यातील बहुतेक जणांना ही माहिती नसते की, पीएफ बॅलंस केव्हा केव्हा काढता येऊ शकते. पीएफ काढण्याने टॅक्स लागत नाही. आज Divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे की, तुमचा पीएफ केव्हा आणि कसा काढता येऊ शकतो. तसेच तुम्ही ऑनलाईन पीएफ बॅलंस कशा प्रकारे पाहू शकता याचीही माहिती देणार आहोत.
पीएफची रक्कम आपातकालीन परिस्थितीत काढता येऊ शकते. या 7 परिस्थितीत तुम्हाला तुमची पीएफची रक्कम काढता येऊ शकते. काही परिस्थितीमध्ये तुम्ही पीएफची संपूर्ण रक्कम काढू शकता आणि काही वेळेस तुम्ही पीएफ रकमेतील एक ठरावीक रक्कमच काढू शकता. पाहयात ह्या 7 वेळा कोणत्या आहेत, ज्यावेळी तुम्ही पीएफ रक्कम काढू शकाल.

1- मेडिकल ट्रीटमेंट-

=> तुम्ही स्वतः, पत्नी, मुले अथवा आई-वडील यांच्या वैद्यकीय उपचारासाठी पीएफ काढू शकता.

=> या परिस्थितीत तुम्ही केव्हाही पीएफ काढू शकता. यामध्ये तुम्ही केव्हा नोकरीला लागले अथवा तुम्ही किती वर्षांपासून नोकरीत आहात याबद्दल काहीच विचारणा केली जात नाही.

=> मात्र यासाठी एक महिना अथवा त्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात भरती असल्याचे पुरावे सादर करावे लागतात.

=> तसेच यासाठी कर्मचार्‍याला कंपनीचे अप्रूव्ह लिव्ह सर्टीफिकेटही द्यावे लागते.

=> पीएफच्या पैशावर मेडिकल ट्रीटमेंट घेणार्‍या व्यक्तीला कंपनीकडून अथवा ईएसआयसीकडून एक स्विकृती प्रमाणपत्र (अप्रूव्ह सर्टीफिकेट) द्यावे लागते. या सर्टीफिकेटमध्ये अशी घोषणा केलेली असते की, ज्याला मेडीकल ट्रीटमेंट हवी आहे, त्याच्या पर्यंत ईएसआयची सुविधा पोहोचवता येत नाही, अथवा त्याला ईएसआय सुविधा मिळत नाही.

=> या अंतर्गत पीएफचे पैसे काढण्यासाठी फॉर्म 31 अंतर्गत अर्ज करण्यासोबतच आजारपणाचे प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रे जोडावी लागतात. ज्यामुळे सत्याची पडताळणी होईल.

=> मेडिकल ट्रीटमेंटसाठी कोणताही व्यक्ती आपल्या वेतनाच्या 6 पट अथवा संपूर्ण पीएफचा पैसा, जेवढा असेल तो संपूर्ण काढू शकतो.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, कोणकोणत्या परिस्थितीत काढता येऊ शकतो पीएफचा पैसा...

नोट- फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.