आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Confederation Of All India Traders News In Marathi

महाराष्ट्रातील व्यापार-उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील व्यापार-उद्योग क्षेत्राच्या केंद्र व राज्य शासन स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी तसेच व्यापार-उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) चीफ पेट्रन व भास्कर उद्योग समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांनी दिले.

दिल्लीतील व्यापार्‍यांच्या महाअधिवेशनप्रसंगी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील व्यापार-उद्योजकांच्या शिष्टमंडळाने रमेशचंद्र अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्याप्रसंगी अग्रवाल यांनी हे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

ललित गांधी यांनी या वेळी महाराष्ट्रातील वाढलेले वीजदर, विमानतळ व रेल्वेच्या अपुर्‍या सुविधा, एलबीटीसारख्या जाचक कर तरतुदी, नवीन उद्योजकांना जागा मिळण्यात येणार्‍या अडचणी तसेच छोट्या व्यापार्‍यांना सवलतीच्या दराने कर्जपुरवठा मिळण्याची आवश्यकता हे विषय चर्चेमध्ये मांडण्यात आले.

(फोटो : नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय व्यापारी परिषदेत कॅटचे चीफ पेट्रन व भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांच्यासमवेत वेस्टर्न महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, पुरुषोत्तम टावरी, अजित सेठिया आदी.)