आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Confirmed 8 Inch Samsung Galaxy Note Will Come In February

सॅमसंगचा बिग स्क्रीन गॅलेक्सी नोट येत्या फेब्रुवारीत बाजारात!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Samsung Galaxy Note - Divya Marathi
Samsung Galaxy Note

येत्या फेब्रुवारी महिन्यात दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग आपल्या 8 इंचाचा बिग स्क्रीन गॅलेक्सी नोट बाजारात अवतरणार आहे. बार्सिलोना येथील जागतिक मोबाइल परिषदेत गॅलेक्सी नोट लॉन्च करण्‍याची सॅमसंगने तयारी केली असल्याचे माहिती मोबाईल हेड जे.के.शिन यांनी दिली. गॅलेक्सीच्या अन्य फीचर्सबाबत माहिती देण्यास शिन यांनी नकार दिला.

स्क्रीन रिझोलुशन 1280X800 पिक्सेल आहे. 8 इंचाची स्क्रीन असलेल्या गॅलेक्सी नोटमध्ये 2 GBची रॅम असून 1.6 GHz चे प्रोसेसर आहे. यात अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टम 4.2 जेलीबिन व्हर्जन आहे. कॅमेरा हा 5 मेगा पिक्सलचा आहे. इंटरनल मेमरी 16 GB ची आहे. या मोबाईची किंमत क‍िती असेल याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.