आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Connecting Urdu... Nokia Launched Special Handset For The Urdu Speakers

कनेक्टिंग उर्दू .. नोकियाचा उर्दू भाषकांसाठी खास हँडसेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपल्या मातृभाषेत मोबाइल वापरायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नाही आणि या पद्धतीतून भाषिकांना कनेक्ट करण्यात नोकिया नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता त्याचेच पुढचे पाऊल म्हणून नोकिया 15 कोटी उर्दू भाषिकांना कनेक्ट करणार आहे. उर्दू बांधवांसाठी देशातील पहिला वहिला मोबाइल आणून फिनलँडमधील या कंपनीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.


या मोबाइलचे अनावरण करताना दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल म्हणाले की, अन्य देशांबाबत माहिती नाही; परंतु उर्दू भाषेत संवाद साधणारा ‘नोकिया ड्युएल सिम 114’ हा देशातील पहिला मोबाइल आहे. नोकियाने सहा - आठ महिन्यांपूर्वी माझ्याशी संपर्क साधला त्या वेळी 15 कोटी उर्दू भाषिकांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पेलू शकाल का, असे विचारले होते; परंतु कंपनीने घेतलेला पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे. नोकिया मोबाइल विविध भाषांना पूरक ठरू शकेल, अशा प्रकारे तो विकसित करण्यात आला. फक्त त्यात उर्दूची कमतरता होती; परंतु आज देशभरातील 15 कोटी उर्दू भाषिकांपर्यंत पोहोचता येऊ शकणार आहे. दूरसंचार मंत्र्यांनी दिलेले आव्हान तडीस नेल्याबद्दल आपणास समाधान वाटत असल्याचे नोकिया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पी. बालाजी यांनी सांगितले.