आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थसंकल्पापूर्वी कन्सॉलिडेट होणार शेअर बाजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुलनेने खालच्या पातळीवर असलेल्या बाजारात चांगल्या प्रकारे खरेदी झाल्याने मंगळवारी समभागांत तेजी दिसून आली. केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारकडून सकारात्मक उपाय आणण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदार पुन्हा शेअर बाजाराकडे वळले आहेत. मात्र, हे घडण्यापूर्वी काही आठवडे देशातील शेअर बाजारात काही प्रमाणात विक्री आणि आघाडीच्या समभागांत नफेखोरीचा दबाव दिसून आला. अर्थसंकल्पापूर्वी बाजारात काही प्रमाणात कन्सॉलिडेशन (मजबुती) होण्याची शक्यता आहे. याला अनुसरूनच मागील आठवड्यात बाजारात कन्सॉलिडेशन बँडची खालची पातळी गाठली. त्यानंतर काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. मागच्या वेळी स्तंभात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीला 7485 पातळीनजीक चांगला आधार मिळेल आणि त्यानंतर खरेदी होईल. सोमवारी निफ्टी या पातळीच्या खाली आला होता, मात्र नंतर तो या पातळीच्या वर बंद झाला. बाजारात आगामी काळात काय होणार आहे याचे हे संकेत होते आणि मंगळवारी बाजाराने उसळी घेतली. आता बाजार सकारात्मक कलासह कन्सॉलिडेशन झोनमध्ये आला आहे. सध्या तरी निफ्टी वरील दिशेने 7749 ते 7791 या दरम्यान आणि खालच्या दिशेने 7412 या पातळीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

तसे पाहिले तर मागील आठवड्यातील स्थितीत तसा काही फारसा फरक पडलेला नाही. कारण त्या आठवड्यात कोणतीही खास आर्थिक आकडेवारी जाहीर झाली नाही, मात्र रेल्वेचे प्रवासी आणि माल वाहतुकीचे भाडे वाढल्याने गुंतवणूकदार सतर्क झाले. यामुळे इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे. प्रवासी व माल वाहतूक महागणार हे निश्चित होते, मात्र त्यात एवढी वाढ अपेक्षित नव्हती. त्यामुळे त्याचा बाजारावर विशेष परिणाम दिसला नाही. आता सर्वांच्या नजरा आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. यात भारतीय अर्थव्यवस्थेला रुळावर आणणारा मार्ग असण्याची शक्यता आहे.

जागतिक पातळीवर फेडरल रिझर्व्हने नरमाईचे धोरण अवलंबल्याने बाजारात उत्साह दिसून आला. अनेक विकसनशील देशांत सुधारणा दिसून आली. असे असले तरी अमेरिकेचा आर्थिक विकास दर कमी राहण्याच्या अंदाजाने या उत्साहावर काही प्रमाणात पाणी पडले. तेथील आर्थिक विकास दरावर सर्वांची नजर राहील. हे आकडे निराशाजनक आले तर अमेरिकेच्या बाजारात मोठ्या प्रमाणात नफावसुली होण्याची शक्यता आहे. या शिवाय गुंतवणूकदारांनी कच्च्या तेलाच्या किमतीवर बारकाईने नजर ठेवणे आवश्यक आहे. इराकमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने तेजीत आहेत.

देशातील स्थितीबाबत सांगायचे झाले तर अर्थसंकल्पापूर्वी बाजारात सकारात्मक कलासह कन्सॉलिडेशनची शक्यता आहे. म्हणजेच घसरणीनंतर खालच्या पातळीवर खरेदी होण्याची शक्यता आहे. मात्र, घसरण मर्यादित असेल. निफ्टीला वरच्या दिशेने 7591 च्या आसपास इमिजिएट अडथळा आहे. हा हलका अडथळा आहे, व्हॉल्यूमसह खरेदी झाल्यास हा टिकणार नाही. मात्र, निफ्टी या पातळीच्या वर बंद होणे बाजारासाठी सकारात्मक राहील. यामुळे कल अधिक पक्का होईल. निफ्टीला पुढील अडथळा 7671 या पातळीनजीक होईल. हा एक मजबूत अडथळा असेल आणि या स्तराच्या आसपास काही प्रमाणात कन्सॉलिडेशन दिसून येईल. मात्र, निफ्टीने हा स्तर पार केल्यास 7749 ते 7791 ही वरची पातळी महत्त्वाची होईल आणि या पातळीच्या नजीक तांत्रिक करेक्शन दिसून येईल. निफ्टीला खालच्या दिशेने पहिला आधार 7501 वर आहे. हा एक मजबूत आधार असून ही पातळी तुटल्यास निफ्टीला 7412 वर महत्त्वाचा आधार मिळण्याची शक्यता आहे.

या समभागांकडे ठेवा लक्ष :
या आठवड्यात टाटा मोटर्स लिमिटेड, डिश टीव्ही इंडिया लिमिटेड आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेज चार्टवर उत्तम दिसताहेत. टाटा मोटर्सचा मागील बंद भाव 442.14 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 451 रुपये, तर स्टॉप लॉस 432 रुपये आहे. डिश टीव्हीचा मागील बंद भाव 56.90 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 59 रुपये, तर स्टॉप लॉस 54 रुपये आहे. हिंदाल्कोचा मागील बंद भाव 166.80 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 171 रुपये आणि स्टॉप लॉस 162 रुपये आहे.
- लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.comचे सीईओ आहेत.
vipul.verma@dainikbhaskargroup.com