Home | Business | Share Market | constantly 2 day sensex raises 75 points

सलग दुस-या दिवशीही सेन्सेक्स उसळला; 75 अंकांची वाढ

प्रतिनिधी | Update - Jun 08, 2011, 05:07 AM IST

विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून बाजारात चांगल्या भांडवलाचा ओघ येत असल्यामुळे

  • constantly 2 day sensex raises 75 points

    मुंबई- आशियाई शेअर बाजारातील नरमाईचा परिणाम सलग दुस-या दिवशी बाजारावर झाला. त्यामुळे सकाळच्या सत्रात बाजारात मरगळीचे वातावरण होते.

    परंतु भक्कम स्थितीत असलेला जागतिक बाजार आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून भांडवल बाजारात येत असलेल्या निधीच्या ओघामुळे दुपारच्या सत्रात बाजाराचे वातावरण बदलले. रिअ‍ॅल्टी, आयटी, हेल्थकेअर तसेच तेल आणि वायू कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी होऊन सेन्सेक्समध्ये ७५ अंकांची वाढ झाली. सकाळी सेन्सेक्स खालच्या पातळीवर उघडला. त्यानंतर दिवसभरात १८५४५.९५ आणि १८३५१.२४ अंकांच्या दरम्यान झुलल्यानंतर दिवसअखेर तो १८४९५.६२ अंकांवर बंद झाला. राष्टीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकात २४ अंकांची वाढ होऊन तो ५५५६ अंकांवर बंद झाला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून बाजारात चांगल्या भांडवलाचा ओघ येत असल्यामुळे दोन दिवस बाजारात सुधारणा झाल्यासारखी वाटत आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळेही बाजाराची चिंता काहीशी दूर झाली असून तेल उत्पादन करणाºया देशांचा गट कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याबाबत काहीतरी निर्णय घेईल अशी अपेक्षा बाजाराला आहे. बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी युरोप, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या बाजारात आलेली तेजीही कारणीभूत होती.

Trending