आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Consumer : Banks Offer Attractive Cheap Home, Vehicle Loan

ग्राहकांना आ‍कर्षित करण्‍यासाठी स्वस्त गृह, वाहन कर्जासाठी बँका सरसावल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्जाची घटलेली मागणी आणि कंपनी कर्जाचा पदर सोडून बँका आता सर्वसामान्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सरसावल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांनी विशेष व्याजदरात कर्ज देण्याच्या आफर्स आखल्या आहेत. देशभरात कर्ज मेळावे आणि बंपर योजनांच्या माध्यमातून गृह, वाहन, शिक्षण आणि लघु उद्योगांसाठी कमी व्याजदरातील कर्ज देण्याची तयारी बँकांनी केली आहे.


सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँक, कॉर्पोरेशन बँक, आयडीबीआय बँक, आंध्र बँक यांच्यासह इतर बँकांनी लोन एक्स्पोचे आयोजन केले आहे. याशिवाय जास्तीत जास्त ग्राहकांनी पुन्हा बँकांतील ठेवीकडे वळावे यासाठी नव्या बचत योजना आणि नेहमीच्या बचत योजनांबरोबर काही मोफत सुविधा बँकांकडून देण्यात येत आहेत.
कॅनरा बँकेचे सीजीएम अजय कुमार यांनी सांगितले, किरकोळ कर्ज क्षेत्राचा अधिक विस्तार घेणे हा कॅनरा बँकेचा मुख्य उद्देश आहे. यात गृह, वाहन आणि शैक्षणिक कर्जावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित राहील. यासाठी देशभरात किरकोळ कर्ज मेळावे घेण्यात येत आहेत. त्यासाठी देशातील प्रमुख कार कंपन्यांच्या वितरकांशी बँकेने करार केला आहे. तसेच गृहकर्जासाठी नामांकित बिल्डरांशी बँकेने कर्ज सुविधेबाबत करार केले आहेत.


कॉर्पोरेशन बँकेनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मान्सून बंपर ऑफर जाहीर केली आहे. याबाबत बँकेचे सीजीएम जयकुमार गर्ग यांनी सांगितले, बँकेने मान्सून बंपर नावाने कर्जासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेअंतर्गत 50 लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी 10.25 टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. हे व्याजदर बँकेच्या सामान्य स्वरूपातील व्याजापेक्षा 0.25 टक्क्यांनी कमी आहेत. याशिवाय या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार नाही. वाहन कर्जाच्या बाबतीत 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी व्याजदरात 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे. वाहन कर्जासाठी मोहिमेअंतर्गत 10.45 टक्के व्याज निश्चित करण्यात आले आहे.


कॉर्पोरेशन बँक
० 50 लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी 10.25 टक्के व्याज
० वाहन कर्जाच्या बाबतीत 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 10.45 टक्के व्याज
सार्वजनिक बँकांच्या कमी व्याजदराच्या योजना


कॅनरा बँक
० ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कॅनरा बँकेने खास ऑफर जाहीर केली आहे. त्यानुसार 30 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर 10.25 टक्के, 30 ते 75 लाख रुपयांच्या कर्जासाठी 10.30 टक्के, तर 75 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या कर्जावर 10.50 टक्के व्याज आकारण्यात येणार आहे.
० वाहन कर्जासाठी ग्राहकांनी निम्मी रक्कम भरल्यास 10.75 टक्के व्याज आकारणी होणार आहे.