आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोयोटा सलग तिस-या वर्षी अव्वल क्रमांकावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकिओ - टोयोटा या जपानी कार निर्मात्या कंपनीने सलग तिस-या वर्षी जगातील सर्वात मोठी ऑटो कंपनीचे स्थान कायम राखले आहे. वर्ष २०१४ मध्ये कंपनीने एकूण एक कोटी दोन लाख ३० हजार कारची विक्री केली असून हा विक्रम आहे. फॉक्सवॅगन एक कोटी एक लाख ४० हजार कार विक्रीसह दुस-या तर जनरल मोटर्स ९९ लाख २० हजार कार विक्रीसह तिस-या क्रमांकावर राहिली.

टोयोटाने २००८ मध्ये सर्वप्रथम सर्वात मोठी कार कंपनी म्हणून अव्वल स्थान पटकावले होते. मात्र, मार्च २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या भूकंप व सुनामीमुळे कंपनीच्या उत्पादनावर परिणाम झाला आणि तेव्हा जनरल मोटर्सने अव्वल क्रमांक पटकावला होता, परंतु २०१२ मध्ये टोयोटाने पुन्हा पहिला क्रमांक मिळवला. तेव्हापासून कंपनी अव्वल क्रमांकावर आहे. जीएम २००७ पर्यंत ७० वर्षांहून अधिक काळ पहिल्या क्रमांकाची कंपनी होती.

१५ वर्षांत प्रथमच विक्री घटण्याचा अंदाज : मागणीच्या अभावी टोयोटाने विक्रीचा अंदाज एक टक्क्याने घटवला आहे. कंपनीच्या मते, २०१५ मध्ये कंपनी १.०१ कोटी वाहनांची विक्री होईल. असे झाले तर फॉक्सवॅगन अव्व्ल क्रमांकावर राहील.