Home »Business »Share Market» Control On Boom In Market : Sensex Come Down 111 Number

बाजारातील तेजीला ओहोटी : निर्देशांक 111 अंकांनी घसरला

प्रतिनिधी | Feb 15, 2013, 00:00 AM IST

  • बाजारातील तेजीला ओहोटी : निर्देशांक  111 अंकांनी घसरला


मुंबई - स्पेक्ट्रम घोटाळ्यातील भारती एअरटेलचे नाव आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक निकालाने केलेला अपेक्षाभंग यामुळे शेअर बाजारातील तेजीला गुरुवारी ओहोटी लागली. महागाईने नीचांकी स्तर गाठल्याच्या सकारात्मक वृत्ताचाही फारसा परिणाम बाजारावर दिसला नाही. सेन्सेक्स 110.90 अंकांनी गडगडून 19,639.83 या स्तरावर बंद झाला. निफ्टीतही 36 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 5,940.20 अंकांवर बंद झाला.

स्पेक्ट्रम घोटाळ्यातील भारती एअरटेलच्या भूमिकेमुळे या समभागात 4 टक्के घसरण दिसून आली. विप्रो एक एप्रिलपासून एनएसईमधून बाहेर पडण्याच्या वृत्ताने विप्रोच्या समभागात 3.3 टक्के घट आली. एसबीआयने निकालात अपेक्षाभंग केल्याने त्याचेही समभाग आपटले. रिलायन्स, मारुती-सुझुकी, एल अँड टी या दिग्गज समभागांची जोरदार विक्री झाल्याने बाजारात नकारात्मक वातावरण राहिले.

Next Article

Recommended