नवी दिल्ली - मोदी सरकारच्या अनेक प्रयत्नांनंतरही औद्योगिक उत्पादनाची स्थिती सुधारत नसल्याचे चित्र आहे. सप्टेंबरमध्ये आठ प्रमुख उद्योगांचा विकास दर केवळ १.९ टक्के राहिला. जानेवारीनंतरची ही सर्वात नीचांकी पातळी आहे. जानेवारीत या दरात १.६ टक्के वाढ झाली होती. सप्टेंबर २०१३ मध्ये यात टक्के वाढ झाली होती. वाणिज्य तसेच उद्योग मंत्रालयाच्या मते, कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनाच्या किमतीत सलग तिसर्या महिन्यात घट आली आहे. खतांमध्ये चौथ्या महिन्यांतही वाढ नकारात्मक राहिली. नैसर्गिक वायूच्या उत्पादनात तर गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून सातत्याने घट आहे.
एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत औद्योगिक उत्पादनाचा विकास दर ४.० टक्के राहिला. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत हा दर ५.० टक्के होता. सप्टेंबरमधील खराब कामगिरीचा परिणाम औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) वर दिसून येईल. आयआयपीमध्ये कोअर सेक्टरचा वाटा ३८ टक्के आहे.
- औद्योगिक उत्पादन विकास दर १.९ टक्क्यांवर आला आहे. जानेवारीनंतरची ही नीचांकी पातळी आहे. जानेवारीमध्ये औद्योगिक विकास दर १.६ टक्के होता. तर चालू आर्थिक वर्षात मेमध्ये २.७ टक्के पातळीत होता. - वाणिज्य उद्योग मंत्रालय अहवाल
कोअर सेक्टर वाढ
एप्रिल- ४.२
मे- २.३
जून- ७.३
जुलै - २.७
ऑगस्ट - ५.८
सप्टेंबर - १.९
उत्पादन वाढ
कोळसा- ७.२
स्टील - ४.०
सिमेंट - ३.२
वीज - ३.८
उत्पादनात घट
खते- ११.६
नैसर्गिक वायू - ६.२
पेट्रो रिफायनरी - २.५
कच्चे तेल - १.१
(सर्व आकडे टक्क्यांत)